गुन्हे विषयक
कोपरगावात कालवडीची चोरी,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथील रहिवासी असलेले फिर्यादी शेतकरी अविनाश रावसाहेब वर्पे (वय-२६) यांची आपल्या घरानजीक असलेल्या गायीच्या गोठ्यात बांधून ठेवलेली सोळा महिन्याची गायीची कालवड अज्ञातच चोरट्यानी चोरून नेली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.त्यामुळे मळेगाव थडी व परिसरातील शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे.
संकल्पित छायाचित्र
कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी ग्रामपंचायत हद्दीत दि.२६ मे रोजी रात्री घडली आहे.फिर्यादीने त्यांच्या गोठ्यात बांधून ठेवलेली गायीची सोळा महिन्याची १० हजार रुपये किमतीची कालवड अज्ञातच चोरट्याने मालक वर्पे यांच्या संमतीविनाच आर्थिक फायद्यासाठी चोरून नेली आहे.ती कालवड काळ्या-पांढऱ्या रंगाची असून तिला शिंगे नाही.तिच्या कपाळावर पांढरा रंग असून दोन्ही डोळ्यांना काळा रंग आहे.
वर्तमानात चोरट्यानी आपल्या लीला वाढवल्या असून हाथ की सफाई दाखवून कोपरगाव तालुका पोलिसांपुढे आव्हान निर्माण करण्याचे काम सुरु केले आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी ग्रामपंचायत हद्दीत दि.२६ मे रोजी रात्री घडली आहे.फिर्यादीने त्यांच्या गोठ्यात बांधून ठेवलेली गायीची सोळा महिन्याची १० हजार रुपये किमतीची कालवड अज्ञातच चोरट्याने मालक वर्पे यांच्या संमतीविनाच आर्थिक फायद्यासाठी चोरून नेली आहे.ती कालवड काळ्या-पांढऱ्या रंगाची असून तिला शिंगे नाही.तिच्या कपाळावर पांढरा रंग असून दोन्ही डोळ्यांना काळा रंग आहे.या प्रकरणी फिर्यादी अविनाश वर्पे यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१८७/२०२२ भा.द.वि कलम १७९ प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.बोठे हे करित आहेत.