गुन्हे विषयक
शेळ्यांसह बोकडांची चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक पश्चिमेस असलेल्या जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादीच्या रुपये २५ हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्या व एक बोकड अज्ञात चोरट्याने रविवार दि.०१ मेच्या पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास घरासमोरून चोरून नेले असल्याचा गुन्हा कमलाबाई पंढरीनाथ काळे (वय-५०) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठण्यात दाखल केल्याने पशुपालकांत खळबळ उडाली आहे.
रविवार दि.०१ मे या दिवशी फिर्यादी महिला व सदर कुटुंबातील सर्व माणसे पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास गाढ झोपेत असताना अज्ञातच चोरट्याने त्यांच्या सुमारे २५ हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्या त्यात एक तांबड्या रंगाची शेळी तर दुसरी काळ्या रंगाची शेळी तिच्या पोटाला लाल पट्टा असलेली दोन वर्ष वयाची या शिवाय एक काळ्या रंगाचा बोकड असा २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि जेऊर पाटोदा हद्दीत रहिवासी असून ती तेथे आपल्या कुटुंब कबिल्यासह रहाते.रविवार दि.०१ मे या दिवशी सदर कुटुंबातील सर्व माणसे पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास गाढ झोपेत असताना अज्ञातच चोरट्याने त्यांच्या सुमारे २५ हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्या त्यात एक तांबड्या रंगाची शेळी तर दुसरी काळ्या रंगाची शेळी तिच्या पोटाला लाल पट्टा असलेली दोन वर्ष वयाची याशिवाय एक काळ्या रंगाचा बोकड असा ऐवज फिर्यादी महिलेच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेला आहे.या प्रकरणी फिर्यादी महिला यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक देसले यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव शहर पोलीसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१०८ /२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पी.बी.ढाकणे हे करित आहेत.