गुन्हे विषयक
कोपरगाव नजीक अपघात,जीपचे नुकसान,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा चौफुलीवर नुकताच राज इन्फ्रास्ट्रॅक्टर डेव्हलपमेंट प्रा.ली.कंपनीचा मिनर (क्रं.एम.एच.११ एल.०८४०) व महिंद्रा बोलेरो गाडी (क्रं.एम.एच.१७ ए.ए.१६९८) यांच्यात अपघात होऊन यात तळेगाव दिघे येथील जीपचे नुकसान आले असल्याची माहिती प्राप्त झाली असून या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ.राजेंद्र सूर्यभान कांबळे यांनी आरोपी सुभाष चंद्र प्रजापती वय-(४०) रा.नदिली,ता.निजमाबाद जि.आजमगढ याचे विरुद्ध कोपरगाव शहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुणतांबा फाटा चौफुली जवळ झगडेफाटा रस्त्यावर दि.२५ एप्रिल रोजी सायंकाळी ०७.५० वाजेच्या सुमारास वरील क्रमांकाचा मिनर चालक याने आपल्या ताब्यातील मिनर हा औरंगाबाद-नागपूर रोडने पुणतांबा चौफुलीवर जोरात बेदरकारपणे,धोकादायकपणे व हयगयीने चालवून महिंद्रा बोलेरो कंपनीच्या जीपला जोराची धडक दिली आहे.त्यात या जीपचे नुकसान झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहराचे नजीक दक्षिणेस साधारण दीड कि.मी.अंतरावर पुणतांबा फाटा चौफुली आहे.या ठिकाणी दि.२५ एप्रिल रोजी सायंकाळी ०७.५० वाजेच्या सुमारास वरील क्रमांकाचा मिनर चालक याने आपल्या ताब्यातील मिनर हा औरंगाबाद-नागपूर रोडने पुणतांबा चौफुलीवर जोरात बेदरकारपणे,धोकादायकपणे व हयगयीने चालवून महिंद्रा बोलेरो कंपनीच्या जीपला जोराची धडक दिली आहे.त्यात या जीपचे नुकसान झाले आहे. यांच्यात धडक होऊन यात जीपचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिसना निरीक्षक व सहाय्यक फौजदार यांनी भेट दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ.राजेंद्र कांबळे यांनी आरोपी मिनर चालक सुभाष चंद्र प्रजापती याचे विरुद्ध गुन्हा क्रं.९९/२०२२ दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.पी.बी.ढाकणे हे करित आहेत.