जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

जेवणावरून भांडण,एकास मारहाण,कोपरगाव सेनाशहर प्रमुखासह चार आरोपी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील आरोपी वैभव गीते,इरफान शेख,कलविंदर दडियाल व अन्य एक अनोळखी आरोपी यांनी आपल्याला मारहाण केली असल्याची फिर्याद समतानगर येथील रहिवासी असलेल्या युवक दीपक राजेंद्र नाईकवाडे (वय-३५) याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.दरम्यान यातील तीन क्रमांकाचा आरोपी हा शहर सेनेचा अध्यक्ष असल्याचे समजते.

दि.१९ एप्रिल रोजी सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास कोपरगाव तहसील कार्यालयासमोर रोडवर आपल्या दुचाकीस त्यांच्या दोन दुचाकी आडव्या लावून सकाळी त्यांच्यात हॉटेल मध्ये जेवणावरून झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादिस म्हणाला की,”तू,आमच्या नादी का लागतो ? असे म्हणून शिवीगाळ करून आरोपी वैभव गीते याने त्याच्या हातातील काठीने फिर्यादी दीपक नाईकवाडे याचे कपाळावर मारून दुखापत केली आहे.तर अन्य तिघांनी बुक्क्या व चापटीने मारहाण केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी दीपक नाईकवाडे हा समतानगर येथील रहिवासी असून तो व त्याचा मित्र असे दोघे जण आपल्या घरी जात असताना कोपरगाव बेट येथील रहिवासी असलेला आरोपी वैभव गीते,इरफान शेख,(निवारा कोपरगाव) कलविंदर दडियाल (शिवसेना शहर प्रमुख) येवला रोड कोपरगाव व अन्य एक अनोळखी आरोपी यांनी दि.१९ एप्रिल रोजी सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयासमोर रोडवर आपल्या दुचाकीस त्यांच्या दोन दुचाकी आडव्या लावून सकाळी त्यांच्यात हॉटेल मध्ये जेवणावरून झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादिस म्हणाला की,”तू,आमच्या नादी का लागतो ? असे म्हणून शिवीगाळ करून आरोपी वैभव गीते याने त्याच्या हातातील काठीने फिर्यादी दीपक नाईकवाडे याचे कपाळावर मारून दुखापत केली आहे. तर अन्य आरोपी इरफान शेख,कलविंदर दडियाल (शिवसेना शहर प्रमुख) व अन्य एक अनोळखी आरोपी यांनी संगनमताने फिर्यादिस शिवीगाळ करून चापट व बुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहे”असे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक व सहाय्यक फौजदार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.९८/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३४१,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close