जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात ऍट्रॉसिटी,चार जणांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली फिर्यादी महिला (वय-३४) हि घरात तिची आई व भाऊ असे झोपलेले असताना सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्यांचे घरापाठीमागे राहणारा आरोपी यशवंत रभाजी कोळपे हा फिर्यादीच्या घरात आला व फिर्यादीस घर खाली करण्यासाठी जातीवाचक शिवीगाळ करून फिर्यादी महिलेचा विनय भंग केला तर अन्य तिघांनी त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली असल्याची फिर्याद सबंधित महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दखल केल्याने खळबळ उडाली आहे.

कोळपेवाडी येथील आरोपी यशवंत रभाजी कोळपे हा फिर्यादीच्या घरात प्रवेश केला व फिर्यादीस म्हणाला की,” मादरचोदहो उठा,”माझे घर खाली करा”, “घर काय तुमच्या बापाचे नाही” असे म्हणून जोरजोरात वाईट वाईट जातीवाचक शिवीगाळ करून यातील फिर्यादी यांचे तोंडावर चापट मारून फिर्यादिस जातीवाचक उल्लेख करून,”तुम्ही असे किती जरी असंले तरी मी घाबरत नाही” असे म्हणून फिर्यादीचे अंगात असलेले ब्लाउज ओढून फिर्यादीस मिठी मारून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तर अन्य तिघांनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली फिर्यादी महिला (वय-३४) हि आरोपी यशवंत कोळपे यांचे घरात रहाते.त्यांना घरखाली करावयाचे असल्याने त्यांनी फिर्यादी महिला घरात असताना व तेथे आई व भाऊ असे झोपलेले असताना सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्यांचे घरापाठीमागे राहणारा आरोपी यशवंत रभाजी कोळपे हा फिर्यादीच्या घरात प्रवेश केला व फिर्यादीस म्हणाला की,” मादरचोदहो उठा,”माझे घर खाली करा”, “घर काय तुमच्या बापाचे नाही” असे म्हणून जोरजोरात वाईट वाईट जातीवाचक शिवीगाळ करून यातील फिर्यादी यांचे तोंडावर चापट मारून फिर्यादिस जातीवाचक उल्लेख करून,”तुम्ही असे किती जरी असंले तरी मी घाबरत नाही” असे म्हणून फिर्यादीचे अंगात असलेले ब्लाउज ओढून फिर्यादीस मिठी मारून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तर अन्य आरोपी कोंडाबाई यशवंत कोळपे,संजय यशवंत कोळपे,मंदा सजय कोळपे सर्व रा. कोळपेवाडी यांनी फिर्यादिस,”आमचे घर खाली कर अन्यथा आम्ही तुमचा जीव घेऊ” असे म्हणून लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा कोपरगाव तालुक्यात दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी फिर्यादी महिला हिने आरोपी यशवंत कोळपे सह आरोपी कोंडाबाई यशवंत कोळपे,संजय यशवंत कोळपे,मंदा सजय कोळपे यांचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेतील दोन आरोपी यशवंत कोळपे व संजय कोळपे यांना कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान घटनास्थळी शिर्डी उपविभागीय अधिकारी संजय सातव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आदींनी भेट दिली आहे व घटनेचे गांभीर्य समजून घेतले आहे.व पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१२६/२०२२ अ.जा.ज.(अ.प्र.) अधि.-२०१५ चे सुधारीत कलम ३(१)(आर )( एस),बी.(२) (व्ही-ए ),३(१) (डब्ल्यू)(आय),३(१)(झेड) भा.द.वि.कलम ४५२,३५४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close