जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावकरांमुळे साईसेवा करण्याची संधी-…या नेत्यांचे प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

गत विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी निवडून देऊन मला विधिमंडळात पाठवले.त्यामुळेच आपल्याला साईबाबांची सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.

“कोरोना काळात रुग्णांची केलेली सेवा व आपणा सर्वांच्या आशीर्वादाने श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी मला दिली आहे.त्या माध्यमातून शिर्डी,कोपरगावकरांसाठी विकासाच्या योजना राबविण्यासाठी प्राधान्य देण्याबरोबर ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१ कोटी रुपये मिळाले व हा पाणी प्रश्न सोडविण्यात यश मिळाले आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,श्री साईबाबा संस्थान शिर्डी.

कोपरगाव येथे श्रीरामनवमी निमित्त बालाजी कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री साईगाव पालखी व मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड,संतोष चव्हाण,संजय काळे,संजय जगताप,महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,जिनिंग प्रेसिंचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,माजी नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,राजेंद्र वाकचौरे,रमेश गवळी,दिनकर खरे,राहुल देवळालीकर,बाळासाहेब रुईकर,अशोक आव्हाटे,संदीप कपिले,राजेंद्र आभाळे,निलेश साबळे,सचिन गवारे,महेश उदावंत,नारायण लांडगे,मुकुंद इंगळे,ऋषीकेश खैरनार,मनोज नरोडे,विकि जोशी,विलास आव्हाड,सागर लकारे, गणेश लकारे, राजेंद्र जोशी आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”कोपरगावमध्ये मागील अनेक वर्षापासून दरवर्षी रामनवमीला कोपरगाव ते शिर्डी पायी पदयात्रा आयोजित करून साई पालखी शिर्डीला जात असे.मात्र मार्च २०२० पासून कोरोनाच्या वैश्विक संकटाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे मागील दोन वर्षापासून कोपरगावकरांना साई पालखी नेता आली नाही.परंतु मागील काही महिन्यांपासून साईबाबांच्या कृपेने कोरोनाच्या संकटाची तीव्रता कमी झाल्यामुळे निर्बंध काढून टाकण्यात आले आहे.त्यामुळे पुन्हा साई पालखी कोपरगाववरून शिर्डीला जात आहे.याचा विशेष आनंद वाटत आहे.

दरम्यान साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरूण मंडळाने साईबाबा कॉर्नर येथे भव्य कमान उभारण्याचे व कार्डियाक हॉस्पिटल उभारण्याची मागणी केली आहे.त्या मागणीचा विचार करून विश्वस्त मंडळ निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन त्यांनी शेवटी दिले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड यांनी केले तर सुत्रसंचलन संजय काळे यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार संतोष चव्हाण यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close