गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात दुचाकीची चोरी,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादी अकिल मन्नूलाल पठाण (वय-३३) यांच्या घरासमोर उभी करून ठेवलेली ३० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची दुचाकी (क्रं.एम.एच.१७ सी.के.२८९२) अज्ञातच चोरट्याने पळवुन नेली आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुक्यात वर्तमानात दुचाकी चोरीच्या घटनात वाढ होत असून त्यामुळे दुचाकीस्वारात चिंता वाढली आहे.अशीच घटना नुकतीच कोळगाव थडी येथे घडली आहे.फिर्यादी अकिल पठाण यांनी आपली वरील क्रमांकाची ३० हजार रुपये किमतीची होंडा कंपणीची दुचाकी त्यांच्या घरासमोरून दि.१२ फेब्रुवारी रोजी रात्री ०७ ते १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ०७ चे सुमारास चोरून नेली आहे.
कोपरगाव तालुक्यात वर्तमानात दुचाकी चोरीच्या घटनात वाढ होत असून त्यामुळे दुचाकीस्वारात चिंता वाढली आहे.अशीच घटना नुकतीच कोळगाव थडी येथे घडली आहे.फिर्यादी अकिल पठाण यांनी आपली वरील क्रमांकाची ३० हजार रुपये किमतीची होंडा कंपणीची दुचाकी त्यांच्या घरासमोरून दि.१२ फेब्रुवारी रोजी रात्री ०७ ते १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ०७ चे सुमारास चोरून नेली आहे.त्यांनी या प्रकरणी शोधाशोध करूनही ती मिळून आली नाही.अखेर त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञातच चोरट्या विरुद्ध आज दुपारी ०१ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५५/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही.एन.कोकाटे हे करीत आहेत.