जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

निळवंडे चाऱ्यांना आर्थिक तरतूद करा,मग उदघाटन तारीख ठरवा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राज्यातील काही मंत्र्यांनी निळवंडे कालव्यांचे उदघाटन करण्याची घाई उठवली असून त्याआधी निळवंडे कालव्यांच्या अस्तरीकरण आणि वितरण व्यवस्थेसाठी आर्थिक तरतूद करा,अपुऱ्या कामाचे उदघाटन करण्याची घाई करू नका असे आवाहन निळवंडे कालवा कृती समितीचे जेष्ठ नेते नानासाहेब गाढवे यांनी केले आहे.

“वर्तमान काळात उत्तर नगर जिल्ह्यातील नेते हा प्रकल्प बंद पाडण्याची एकही संधी सोडत नाही.जून महिन्यात महाआघाडी सरकार जाऊन भाजप-एकनाथ सेनेचे युती सरकार आले आहे.त्यात उत्तरेतील या प्रकल्पाला तीन पिढ्यापासून आडवे येणारे काही नेते सत्तेत आले आहे त्यांचे आम्ही स्वागत करतो मात्र त्यांनी बेगडीप्रेमा ऐवजी खऱ्या भावनेने मदत करावी,मात्र या मंडळीची,’कथनी आणि करणी’ यात नेहमीच मोठी तफावत आढळून आली आहे.त्यांनी उच्च न्यायालयाचे आदेश असताना पुन्हा एकदा कोणत्या ना कोणत्या प्रकारे अडचण आणण्याची एकही संधी सोडलेली नाही मात्र आम्ही आगामी काळात या वर्तनात बदल होईल अशी अपेक्षा करतो”-नानासाहेब गाढवे,जेष्ठ नेते,निळवंडे कालवा कृती समिती,अ.नगर-नाशिक.

निळवंडे कालव्यांचे उदघाटन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांनी अकोले तालुक्यातील सद्यस्थिती फिरून पाहणे गरजेचे आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असें की,”निळवंडे हा प्रकल्प ५२ वर्षांपुर्वी सुरू केला तेव्हा त्याची किंमत ७.९६ कोटी रुपये असताना आता पाचव्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार ‘ती’ आता ०४ हजार ९८७ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.आतापर्यंत या प्रकल्पावर सुमारे ०२ हजार ०४० कोटी रुपये खर्च होऊनही दुष्काळी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे एक एकरही सिंचन होऊ शकले नाही.यामुळे सुमारे ५२ वर्षांपासून या प्रकल्पाच्या पाण्याची वाट पाहत आहे.हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उत्तर नगर जिल्ह्यातील प्रशासनावर विसंबून या भागातील शेतकऱ्यांचा अर्धशतकाहून अधिक काळ वाया गेला असून तीन पिढ्यांची वाट लागली आहे हे ओळखुन निळवंडे कालवा कृती समितीने सन-२००६ पासून या प्रकल्पात लक्ष घालायला सुरुवात केली.मदतीने केंद्रीय जलआयोगाकडून १४ मान्यता मिळवल्या.उर्वरित मान्यता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ऍड.अजित काळे यांच्या मदतीने सप्टेंबर २०१६ मध्ये नानासाहेब जवरे व विक्रांत काले यांच्या नावाने एक जनहित याचिका (१३३/२०१६) दाखल केली होती.त्यावेळी मिळाल्या आहे.त्यानंतर कामे सुरु झाली असली तरी वर्तमान काळात उत्तर नगर जिल्ह्यातील पुढारी हा प्रकल्प बंद पाडण्याची एकही संधी सोडत नाही.

“उत्तरेतील नेत्यांना खरेच काम करायचे असते तर त्यांनी खडकेवाके येथे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभेत प्रकल्पास निधी मागण्यास आलेल्या शेतकऱ्यांवर १० ऑगष्ट २०१४ रोजी पोलिसांकरवी लाठी हल्ला केला नसता व ना त्या बद्दल त्यांना माफी मागण्याचा अनास्था प्रसंग ओढवला असता.मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी आदेश दिल्यावर यांनी आगामी आठव्या दिवशी आपल्या सुपुत्राच्या नावे साईबाबा संस्थानच्या इतिवृत्तात (निळवंडे कालवा कृती समिती ऐवजी) स्रेयासाठी स्वतःच्या दिवट्याच्या नावे ५०० कोटी देण्याचा ठराव घुसडला होता.एवढे करून आठ वर्ष उलटली तरी ५०० कोटीतील पाच फुटक्या कवड्या या महाशयांनी दिल्या नाही.मात्र राहाता,आणि कोपरगावातील प्रसिद्धी लोलुप नेत्यांनी आपली बॅनर लावुन प्रसिद्धीची भूक तेवढी भागवून घेतली”-नानासाहेब गाढवे,निळवंडे कालवा कृती समिती,अ.नगर-नाशिक.

जून महिन्यात महा आघाडी सरकार जाऊन भाजप-एकनाथ सेनेचे युती सरकार आले आहे.त्यात उत्तरेतील या प्रकल्पाला तीन पिढ्यापासून आडवे येणारे काही नेते सत्तेत आले आहे त्यांचे आम्ही स्वागत करतो मात्र त्यांनी बेगडीप्रेमा ऐवजी खऱ्या भावनेने मदत करावी असं आवाहन केले आहे.मात्र या मंडळीची,’कथनी आणि करणी’ यात नेहमीच मोठी तफावत आढळून आली आहे.त्यांनी उच्च न्यायालयाचे आदेश असताना पुन्हा एकदा कोणत्या ना कोणत्या प्रकारे अडचण आणण्याची संधी सोडलेली नाही.अडीच महिन्यांपूर्वी याचा पुन्हा एकदा दाहक अनुभव आला आहे.गौण खनिज खाणी बंद करून पुन्हा एकदा आपला दंश या प्रकल्पाला केला आहे.त्यामुळे कृती समीतीने याबाबत उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे.व न्यायालयाने या बाबत ठोस कारवाई करण्यास सुरुवात केली असता या मंडळींचे धाबे दणाणले होते.व जिल्हाधिकारी कार्यालयात यांनी लगेच नेहमीप्रमाणे आपला रंग बंदलून,”आपणच या प्रकल्पाचे तारणहार आहोत” असा मानभावी आव आणण्यास सुरुवात केली आहे.तर त्यांनी याबाबत या प्रकल्पाची पत्रकार परिषदेत माहिती देताना या प्रकल्पात किती गावे आणि किती तालुके आहेत.हेही या महाशयांना अद्याप माहिती नाही,किती कामे झाली किती बाकी हे हि माहिती नाही हे विशेष ! या प्रकल्पास स्थानिक शुक्राचार्य सोडून,ना भाजपची अडचण आहे ना राष्ट्रवादीची,राज्यातील कोणताही पक्ष व नेता या प्रकल्पास आडवा येत नाही असे सांगून गाढवे यांनी,”त्यांना खरेच काम करायचे असते तर त्यांनी खडकेवाके येथे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभेत प्रकल्पास निधी मागण्यास आलेल्या शेतकऱ्यांवर १० ऑगष्ट २०१४ रोजी पोलिसांकरवी लाठी हल्ला केला नसता व ना त्या बद्दल त्यांना माफी मागण्याचा अनास्था प्रसंग ओढवला असता.मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी आदेश दिल्यावर यांनी आगामी आठव्या दिवशी आपल्या सुपुत्राच्या नावे साईबाबा संस्थानच्या इतिवृत्तात (निळवंडे कालवा कृती समिती ऐवजी) स्रेयासाठी स्वतःच्या दिवट्याच्या नावे ५०० कोटी देण्याचा ठराव घुसडला होता.एवढे करून आठ वर्ष उलटली तरी ५०० कोटीतील पाच फुटक्या कवड्या या महाशयांनी दिल्या नाही.मात्र राहाता,आणि कोपरगावातील प्रसिद्धी लोलुप नेत्यांनी आपली बॅनर लावुन प्रसिद्धीची भूक तेवढी भागवून घेतली होती.हे दुष्काळी भागातील शेतकरी विसरलेले नाही.

दरम्यान या प्रकल्पाला संगमनेर आणि अकोले तालुक्यात खडकाळ जमिनीतून येणाऱ्या कालव्यातून पाणी अपव्यय टाळण्यासाठी अस्तरीकरण करणे गरजेचे आहे.त्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे.त्यासाठी कालवा कृती समितीने माजी खा.प्रसाद तनपुरे यांचे मार्फत जलसंपदा विभागाचे तत्कालिन मंत्री जयंत पाटील यांचेकडे पाठपुरावा करून पाचवी ०४ हजार ९८७ कोटी रुपयांचा सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव तयार केला असून वरिष्ठ कार्यालयात धाडला आहे.त्यासाठी आपण खर्च कर्तव्यदक्ष मंत्री असाल तर आपण सदर प्रस्ताव मंजूर करावा व अस्तरीकरण व वितरण व्यवस्थेसाठी आर्थिक तरतूद तातडीने करावी अन्यथा उच्च न्यायालयातून हे कामही निळवंडे कालवा कृती समिती अड्.अजित काळे यांच्या माध्यमातून नक्की करेल असा इशारा नानासाहेब गाढवे यांनी शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close