गुन्हे विषयक
कोयता,लोखंडी गजाने मारहाण करून महिलेचा विनयभंग,कोपरगावात गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या महिलेचा शेताचा बांध व पाटचारी नांगरल्याचा आरोप करून घरात घुसून महिलेचा तिच्या घरात घुसून विनयभंग केला असून फिर्यादी महिलेचा सासरा व चुलत सासरा यांना दगड व खुरप्याने मारहाण करून जखमी केल्याचा गुन्हा फिर्यादी महिला आरती कृष्णा वाणी (वय-२४) हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान यात पहिल्या गुंह्यातील आरोपी महिला द्वारकाबाई शिवराम वाणी यांनी असाच गुन्हा पहिल्या गुंह्यातील फिर्यादी विरुद्ध दाखल केला असून यात आरोपी म्हणून सुनील विष्णू वाणी,ज्ञानेश्वर रामनाथ वाणी,चांगदेव रामनाथ वाणी यांच्या नावाचा समावेश आहे.त्यात त्यांनी आरोपीनी आपल्या विरूद्ध कोयता,गज,काठी आदींनी हल्ला चढवला असल्याचा आरोप केला आहे.व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला आरती वाणी हिचे कुटुंब व आरोपी शिवराम दत्तात्रय वाणी हे एकमेकांचे भाऊबंद आहेत.त्यांची शेजारी शेजारी जमीन आहे.त्यांना जलसंपदा विभागाच्या चारीने पाणी मिळते.त्यांच्याच काही दिवसापासून वैचारिक बेबनाव निर्माण झाला आहे.त्यातच सोमवार दि.२४ जानेवारी रोजी दुपारी ०४ वाजेच्या सुमारास त्यांचा पाटचारी व शेताचा बांध नांगरल्याचा कारणावरुन वाद निर्माण झाला होता.दरम्यान फिर्यादी महिला व तिची सासू या घरी असताना आरोपी मोहन शिवराम वाणी व अमोल शिवराम वाणी यांनी संगनमत करून दोघे एकाच वेळी घरात अनाधिकाराने प्रवेश केला होता.व प्रवेश करून फिर्यादी महिला आरती वाणी व तिची सासू या दोघी घरात असताना तिचा हात धरून तिची ओढणी ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिंचा विनयभंग केला आहे.यातील आरोपी शिवराम दत्तात्रय वाणी,मोहन शिवराम वाणी,अमोल शिवराम वाणी व द्वारकाबाई शिवराम वाणी यांनी फिर्यादी महिलेचा सासरे सुनील विष्णू वाणी,ज्ञानेश्वर रामनाथ वाणी,चांगदेव रामनाथ वाणी,आदींना दगड,खुरपे व लाथा बुक्यांनी मारहाण करून जखमी केले आहे.
दरम्यान फिर्यादी महिलेचे वरील जखमी नातेवाईक यांनी कोपरगाव जमीन रुग्णालायत उपचार घेतल्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान यात पहिल्या गुंह्यातील आरोपी महिला द्वारकाबाई शिवराम वाणी यांनी असाच गुन्हा पहिल्या गुंह्यातील फिर्यादी विरुद्ध दाखल केला असून यात आरोपी म्हणून सुनील विष्णू वाणी,ज्ञानेश्वर रामनाथ वाणी,चांगदेव रामनाथ वाणी यांच्या नावाचा समावेश आहे.त्यात त्यांनी आरोपीनी आपल्या विरूद्ध कोयता,गज,काठी आदींनी हल्ला चढवला असल्याचा आरोप केला आहे.व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.यात शिवराम वाणी,अमोल वाणी,आदी दोन जखमी केले असल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२४/२०२२ भा.द.वि.कलम ३५४,४५२,३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलत राव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.डी.बोटे हे करीत आहेत.