गुन्हे विषयक
एकाची आत्महत्या,कोपरगावात पोलिसांत नोंद
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या अशोक संतु गोधडे (वय ४१) या इसमाने नुकतीच विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली असून त्यास औषधोपचार करण्यास लोणी येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले सता तेथील वैद्यकीय उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मुत घोषित केले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मयत अशोक गोधडे हा शेतमजूर म्हणून त्याच गावात आपल्या नातेवाईकांकडे काम करत होता.त्यांनीच त्यास घटना समजल्यावर उपचारार्थ दाखल केले होते.मात्र त्यांच्या प्रयत्नास अपयश आले आहे.त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत इसम अशोक गोधडे हे कुंभारी येथील रहिवासी असून त्यांनी दि.२३ डिसेंबर रोजी सकाळी ०८.१० वाजे पूर्वी लोणी येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते.त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.त्यांच्या पच्छात आई,पत्नी,एक मुलगा असा परिवार आहे.मयत हा शेतमजूर म्हणून आपल्या नातेवाईकांकडे काम करत होता.त्यांनीच त्यास घटना समजल्यावर उपचारार्थ दाखल केले होते.त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.मयताच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झालेले आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद दप्तर क्रं.६०/२०२१, सी.आर.पी.सी.अन्वये नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.टी.चव्हाण हे करीत आहेत.