जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावातील ‘त्या’ आरोपीस दोन दिवसांची कोठडी !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव बाजार समितीच्या आवारात दि.०३ डिसेंबर सकाळी ९ वाजता एक छोटा हत्ती या रिक्षातून एका चोरट्याने बारा गोण्यात भरलेले ३० हजार रुपये किमतीचे बारा गोण्या सोयाबीन भरून परागंदा झालेला भामटा ज्ञानेश्वर दादा सोनवणे यास कोपरगाव शहर पोलिसांनीं अटक करून त्याच्या ताब्यातील ३० हजार रुपयांच्या बारा गोण्या व २.५० लक्ष रुपयांचा छोटा हत्ती असा ०२ लक्ष ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.या प्रकरणी कोपरगाव बाजार समितीचे सचिव नानासाहेब सोपान रणशूर यांनी गुन्हा दाखल केला होता.कोपरगाव शहर पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

या प्रकरणातील चोरी गेलेला बारा गोण्या सोयाबीन असा २ लक्ष ८० हजारांचा ऐवज नुकताच पोलिसानी पोहेगाव येथून जप्त केला आहे.या प्रकरणी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ डी.आर.तिकोणे,पो.ना.दारकुंडे,पो.कॉ.ढाकरे,यांनी फुटेज तपासणी करून आरोपी ताब्यात घेतला आहे.त्याला नुकतेच कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायाधीश श्री.डोईफोडे यांचे समोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव बाजार समिती हि तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखली जाते.या ठिकाणी शेतकरी आपला शेतीमाल घेऊन विक्रीसाठी येत असतात.सदर ठिकाणी बाजार समितीने चोरी व चोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चलचित्रण सुविधा निर्माण केल्या आहेत.व जागोजागी त्यासाठी माहिती फलक लावून जनजागृती केली आहे.त्यामुळे या ठिकाणी चोरी-मारीचे प्रकार सहसा होत नाही.मात्र यावर एका चोरट्याने नुकतीच मात केलेली असल्याचे दिसून आले आहे.गुरुवार दि.२ डिसेंबर रात्री १० ते ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान कोपरगाव बाजार समिती येथील सकाळच्या वेळी सदर चोरट्याने फाटकावरील पहारेकरी बाजार समितीतील दिवे बंद करण्याचे काम करत आहे.व प्रवेशद्वाराच्या फाटकाजवळ कोणी नाही हि संधी साधून त्याने बाजार समितीत प्रवेश मिळवला व कोणाचे लक्ष नाही हि बाब हेरून तेथील सोयाबीन व्यापारी संतोष ज्ञानदेव सांगळे यांच्या ३० हजार रुपये किमतीच्या सोयाबीनच्या बारा गोण्या आपल्या गाडीत टाकल्या व कोणाचे लक्ष नाही अशी संधी साधून बाहेर पळून गेला होता.तो माल त्याने पोहेगाव येथील सोयाबीन व्यापारी यास शेतकऱ्याचा माल म्हणून विक्री केली असल्याचे उघड झाले आहे.दरम्यान हि बाब तेथील व्यापारी संतोष सांगळे हे आपल्या शेडमध्ये आल्यावर लक्षात आली व त्यांनी तेथील आपला सोयाबीनचा माल गायब असल्याचे लक्षात आले.असता त्यांनी बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर यांचे लक्षात आणून दिले होते.

दरम्यान आरोपीस ताब्यात घेतल्यावर त्याला पोलिसांनी पोलिसांनी हिसका दाखविल्यावर तो पोपटासारखा बोलू लागला.अखेर त्याने तो माल ज्या व्यापाऱ्यास विकला होता त्याकडून काढून दिला आहे.

दरम्यान या घटनेने सचिव रणशूर यांनी आपले चलचित्रण तपासले असता त्यात संशयित आरोपी चोरी करताना आढळून आला असता त्यांनी सदरचे चलचित्रण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

त्या संबंधी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली असता सदरची रिक्षा हि धारणगाव येथील संशयित आरोपी ज्ञानेश्वर सोनवणे याची असल्याचे लक्षात आले होते.त्यांनी आरोपीचा शोध घेतला असता तो धारणगाव येथे शोधून जेरबंद केले होते मात्र मुद्देमाल मात्र ताब्यात मिळाला नव्हता.मात्र तो छोटा हत्ती,(वास्तविक गुंह्यातील ते वाहन छोटा हत्ती नसून टाटा ए. सी.ई आहे.)व त्यातील बारा गोण्या सोयाबीन असा २ लक्ष ८० हजारांचा ऐवज नुकताच पोलिसानी पोहेगाव येथून जप्त केला आहे.या प्रकरणी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ डी.आर.तिकोणे,पो.ना.दारकुंडे,पो.कॉ.ढाकरे,यांनी फुटेज तपासणी करून आरोपी ताब्यात घेतला आहे.त्याला नुकतेच कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायाधीश श्री.डोईफोडे यांचे समोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान पुढील तपास पोलिस निरीक्षक देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close