जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात एका उपनगरात रंगते रंगीली रात्र ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहराच्या वायव्येस साधारण दीड कि.मी.अंतरावर असललेल्या इंदिरापथ लगत पूर्व बाजूस एका नाल्या शेजारी वसलेल्या उपनगरात काही दिवसापासून रात्रीच्या सुमारास एका खाजगी बंगल्यात बाहेरील काही तरुण खाजगी वहानातून रात्रीच्या सुमारास येऊन संगीत रात्र रंगवत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. त्या ठिकाणी शेजारच्या नागरिकांनी तक्रारी केल्यावर बुधवार दि.१० नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी छापा टाकला होता.मात्र त्यासंदर्भात कोणीही जबाबदार अधिकारी बोलण्यास तयार नाही हे विशेष !मात्र नजीकच्या नागरिकांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

संकल्पित छायाचित्र

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेबाबत कानावर हात ठेवले असून आपण आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून माहिती देतो असे सांगुनही चोवीस तासांचा कालावधी उलटला असूनही काहीही प्रतीसाद मिळालेला नाही हे विशेष !

सदरचे सविस्तर वृत्त असे की,राहाता तालुक्यातील लोणी लगत असलेल्या एका खेडेगावातून येऊन एक कनिष्ठ व नवशिक्या वकिलाने काही वर्षांपूर्वी आपला वकिली व्यवसाय हा मनमाडच्या पुढील एका मोठ्या शहरात सुरू केला होता.तेथे त्याची ओळख एका महिलेशी होऊन त्याचे रूपांतरण घनिष्ठ मैत्रीत झाले होते.व पुढे प्रेमात झाले असे बोलले जाते.त्यातून त्याने तेथे एक कार्यालय उघडले व त्या महिलेच्या मदतीने त्या ठिकाणी अनेक दावे चालविण्यासाठी घेतले होते.मात्र काही महिन्यानी आपल्या अशीलांकडून मोठी आर्थिक ‘माया’ गोळा केल्यावर या जोडप्याने त्या ठिकाणाहून धूम ठोकली होती.व त्या नंतर या वकील महाशयांनी आपल्या या लाडक्या महिलेची व्यवस्था शिर्डी येथे लावली होती.मात्र त्या ठिकाणी आपले पितळ उघडे पडेल अशी साधार भीती वाटल्याने या महोदयांनी आपले बस्तान आपल्या मूळ गावी हलवले मात्र या आपल्या ‘जीवस्य कंठस्य’ मैत्रिणीची व्यवस्था कोपरगातील इंदिरा पथ नजीक असलेल्या व रयतचे संस्थापक असलेल्या महापुरुषांच्या उपाधीच्या नावाने वसवलेल्या उपनगरातील (एक व्यापारी ज्याचा बंगला ‘या’ ठिकाणी आहे व व्यापार खडकी रोडला आहे) एका बंगल्यात व्यवस्था करण्यात आली आहे.त्या ठिकाणी काही महिन्यापासून हि सोय करण्यात आलेली आहे.मात्र या ठिकाणी काही महिने गेल्यावर सदर महिलेने आपले काही तरुण मित्र गोळा करण्यास सुरुवात केली असून त्यातून रात्रीच्या सुमारास अवैध दारू व संगीत रात्री सुरु झाल्याची ‘जोरदार’ चर्चा या भागातील नागरिकांत सुरु झाली आहे.अनेकांनी तर सदर महिला व काही तिने बोलावलेल्या ‘तरुणी’ रात्रीच्या सुमारास नऊ ते साडे नऊ वाजेनंतर येऊन घराच्या छतावर नाचताना बघितल्या असल्याची ‘जोरदार चर्चा’ या उपनगरात सुरु आहे.त्यामुळे या प्रतिष्ठित भागातील नागरीकांची शांतता धोक्यात आली आहे.सदर महिला,”आपले पती, हे अकोला (मोठे) येथील एस.पी. कार्यालयात कायदा सल्लागार” असल्याचे व ‘स्वतःही वकील असल्याची’ बतावणी करत असून तिला एक लहान मूलगा असून त्याच्या नावापुढे ‘ती’ राहाता तालुक्यातील तरुण वकिलांचे नाव लावत आहेत.सदर वकील हे कोपरगाव येथील वकील संघाचे सदस्य असल्याची व एका सरकारी अभियोक्त्यांकडे कनिष्ठ सहाय्यक म्हणून दोन वर्ष पूर्वी काम केल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

दरम्यान याबाबत नजीकच्या नागरिकांना ‘या मद्यधुंद खेळाचा’ (?) त्रास सुरु झाल्यावर काही शेजारी नागरिकांनी थेट कोपरगाव शहर पोलीस ठाणे गाठले व सम्बधित प्रकार पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावर घातला असता नव्याने दाखल झालेल्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याने त्या ठिकाणी,”बुधवार दि.१० नोव्हेंबर रोजी ०९.३० वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी सायरन वाजवत धाड टाकली पोलिसांची गाडी तीन वेळेस सायरन वाजवत गेली होती” असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.त्या नंतर तेथील तरुणांनी धूम ठोकली होती.मात्र तेथे नेमके काय सुरू आहे? व पोलिसांनी काय कारवाई केली ? हे कोणालाही सांगता येत नाही हे विशेष !

दरम्यान या बाबत या महिलेने तक्रारदारास चक्क धमकी दिली असून,”काही कारवाई झाली व मला कारागृहात जावे लागले तर तुझ्याकडे पाहून घेईल” असा सज्जड दम भरल्याचे वृत्त आहे.मात्र शहर पोलिसांनी याबाबत का गूपचिळी घेतली याबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close