जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अवैध गोवंश बैल बाजारात ठेऊ देऊ नका-बाजार समितीला..या नेत्यांचा इशारा

जाहिरात-9423439946


न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील गोवंश करणारे आडोसे नुकतेच कोपरगाव नगरपरिषद व पोलीस खाते यांच्या सहाय्याने हटविण्यात आले असले तरी येथे हत्या करण्यात येणारे गोवंश हे कोपरगाव बाजार समितीच्या बैल बाजारात ठेऊन त्याचा दुरुपयोग करण्यात येतो असे लक्षात आले असून आगामी काळात बाजार समितीने बैल बाजारात अवैध रित्या गोवंश बांधून ठेऊन देऊ नये अन्यथा त्याच्या दुष्परिणामांची जबाबदारी घेऊन त्याच्या परिणामास तयार रहावे असा इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी प्रत्रकान्वये दिला आहे.

“तीन वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या कारवाईत जवळपास ३५० गोवंश जप्त करण्यात आले होते.त्यातील बहुतांश जनावरे ही बैलबाजारच्या मैदानात व परिसरात अवैधरित्या ठेवलेली होती.यापुढे बाजार समितिच्या नेत्यांना जाहीरपणे इशारा देऊन ठेवतो कि,”जनावरांच्या बाजाराच्या दिवसाखेरीज सदर ठिकाणी अनधिकृत गोवंश ठेवलेले आढळल्यास कोपरगावात निर्माण होणाऱ्या असंतोषास संबंधिताना तोंड द्यावे लागेल,व अनर्थ होऊ शकतो”-विजय वहाडणे, अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.    कोपरगाव येथील गोवंशप्रेमींच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर काल कोपरगाव शहरातील बेकायदा कसाईखाने,शेड,आडोसे हटविण्यात आल्याने शहरात सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.तथापि पुन्हा गोवंश हत्या होऊ नयेत यासाठी आता प्रशासनाबरोबरच सर्व जनतेनेही सावध रहाणे फारच गरजेचे आहे असे सावध करत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी हे आवाहन केले आहे.

   आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे त्यांनी म्हटले आहे की,”तीन वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या कारवाईत जवळपास ३५० गोवंश जप्त करण्यात आले होते.त्यातील बहुतांश जनावरे ही बैलबाजारच्या मैदानात व परिसरात ठेवलेली होती.आता आपण कोपरगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संबंधित अधिकारी-पदाधिकारी व नेत्यांना जाहीरपणे इशारा देऊन ठेवतो कि,”जनावरांचा आठवडे बाजार दर सोमवारी भरतो त्या बाजाराच्या दिवसाखेरीज सदर ठिकाणी अनधिकृत गोवंश ठेवलेले आढळल्यास कोपरगावात निर्माण होणाऱ्या असंतोषास संबंधिताना तोंड द्यावे लागेल.यानंतर गोवंशहत्या करणाऱ्या कसायांची अनधिकृत जनावरे पैसे घेऊन या जागेत ठेवली असे लक्षात आल्यास अनर्थ होईल.हि बाब अत्यंत गंभीर असून याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

    यानंतर या विषयावर कुणी निवेदन-अर्ज-विनंत्या करण्याची कृषी उत्पन्न बाजार समितीने वाट पाहू नये.शहरातील वातावरण बिघडणार नाही याची जबाबदारी बेकायदेशीर-चुकीचे काम करणाऱ्यांची आहे याचे भान अधिकारी-पदाधिकारी-नेते ठेवतील अशी अपेक्षा आहे असा आशावाद नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close