गुन्हे विषयक
जमिनीच्या वाद,दोन कुटुंबात तुफान हाणामारी,कोपरगावात गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ओगदी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या दोन कुटुंबात जमिनीचा वाद असून त्यातून या कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली असून पोलिसांनी या दोन्ही कुटुंबातील जवळपास पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहे.यात पहिला गुन्हा फिर्यादी हौसाबाई लक्षण कुदळे (वय-५२) यांनी आरोपी शंकर मच्छीन्द्र बागल,वाल्मिक मच्छीन्द्र बागल,लता मच्छीन्द्र बागल यांचे विरुद्ध तर दुसऱ्या गुन्ह्यात फिर्यादी शंकर बागल यांनी आरोपी हौसाबाई कुदळे,लक्ष्मण कुदळे यांचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे ओगदी परिसरात खळबळ उडाली आहे.
ओगदी येथे दि.२६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जमिनीच्या कारणावरून या भांडणाची सुरुवात झाली आहे.त्यातून दोन्ही कुटुंबात लाथा बुक्यांनी व पाठीवर दगडांचा मारा करून हि तुंबळ हाणामारी झाली आहे.यात काहींनी हि हाणामारी सोडविण्यास गेले असता त्यांनाही हा प्रसाद दिला आहे.या प्रकरणी दोषी कुटुंबांनीं एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.सदर घटनास्थळी शंकर बागल,हौसाबाई कुदळे,लक्षण कुदळे आदी तीन जण हे जखमी झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी माहिला हौसाबाई कुदळे यांची व शंकर बागल यांची शेजारी-शेजारी जमीन आहे.या जमीनींच्या वादातून त्यांच्यात नेहमी खटके उडत असताना.विशेषतः फिर्यादी हौसाबाई कुदळे हे बाहेरील गावाची महिला असून त्यांच्या कुटूंबाने काही दिवसापूर्वी ओगदी ग्रामपंचायत हद्दीत जमीन खरेदी केली आहे.याचा शेजारी शेत असलेल्या शंकर बागल यांना राग आला आहे.त्याचा जमिनीवर डोळा होता.मात्र बाहेरील व्यक्ती आमच्या गावात येऊन जमीन खरेदी करतो याचा या दोन्ही कुटुंबात वाद अनेक दिवसापासून धुमसत असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे.
यातून दि.मंगळवार दि.२६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास या भांडणाची सुरुवात झाली आहे.त्यातून दोन्ही कुटुंबात लाथा बुक्यांनी व पाठीवर दगडांचा मारा करून हि तुंबळ हाणामारी झाली आहे.यात काहींनी हि हाणामारी सोडविण्यास गेले असता त्यांनाही हा प्रसाद दिला आहे.या प्रकरणी दोषी कुटुंबांनीं एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.सदर घटनास्थळी शंकर बागल,हौसाबाई कुदळे, लक्षण कुदळे आदी तीन जण हे जखमी झाले आहे.यात फिर्यादी हौसाबाई कुदळे यांनी आपले हा भांडणात आरोपीनी ३० हजार रुपये किमातीचे सोन्याचे दागिने त्यात १ तोळा वजनाची सोन्याची पोत,व ६ ग्रॅम वजनाचे कर्णफुले असा ऐवज लंपास केला असल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३६९/२०२१,३७०/२०२१,भा.द.वि.कलम ३२७,३२४,३२३ अन्वये गुन्हे एकमेका विरोधात दाखल केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.टी.चव्हाण व पो.हे.कॉ.वाखुरे हे करित आहेत.