जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

सासरी महिलेचा छळ,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील माहेर असलेले व शेणीत फाटा ता.घोटी जि. नाशिक येथील सासर असलेल्या महिलेचा शारीरिक,मानसिक छळ केल्या प्रकरणी आरोपी नवरा लक्ष्मण तात्या पवार,सासु साखरबाई तात्या पवार,सासरा तात्या तुकाराम पवार,दीर सुनील तात्या पवार फिर्यादी महिला लता लक्ष्मण पवार (वय-२९) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिला लता पवार हिचे लग्न दि. २८ जून २०१७ रोजी शेणीत फाटा ता.घोटी येथील तरुण लक्ष्मण पवार यांचेशी मोठ्या डामडौलात व वाजत गाजत झाला होता.नव्यानवलाईचे नऊ दिवस संपल्यावर या तरुण दाम्पत्याच्या संबंधात कटू अनुभव यायला लागले होते.मात्र नवीन लग्न,नवीन माणसे यांच्यात काही दिवस समजून घेण्यात गेले मात्र तरीही त्यात काहीही बदल झाला नाही.ते आपल्याला शिवीगाळ,करून आपला शारीरिक मानसिक छळ करू लागले आपण समजून सांगूनही त्यांनी ऐकले नाही अखेर नाईलाज झाला म्हणून आपण हा गुन्हा दाखल केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला लता पवार हिचे लग्न दि. २८ जून २०१७ रोजी शेणीत फाटा ता.घोटी येथील तरुण लक्ष्मण पवार यांचेशी मोठ्या डामडौलात व वाजत गाजत झाला होता.नव्यानवलाईचे नऊ दिवस संपल्यावर या तरुण दाम्पत्याच्या संबंधात कटू अनुभव यायला लागले होते.मात्र नवीन लग्न,नवीन माणसे यांच्यात काही दिवस समजून घेण्यात गेले मात्र तरीही त्यात काहीही बदल झाला नाही.ते आपल्याला शिवीगाळ,करून आपला शारीरिक मानसिक छळ करू लागले आपण समजून सांगूनही त्यांनी ऐकले नाही अखेर नाईलाज झाला म्हणून आपण हा गुन्हा नवरा लक्ष्मण तात्या पवार,सासु साखरबाई तात्या पवार,सासरा तात्या तुकाराम पवार,दीर सुनील तात्या पवार फिर्यादी महिला लता लक्ष्मण पवार यांचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.असे आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक जाधव यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.३५८/२०२१ भा.द.वि.कलम ४९८,(अ),३२३,५०४,५०६ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही.एन.कोकाटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close