गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात वीज पडून बालक ठार,अकस्मात मृत्यूची नोंद
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास आपल्या शेतात आपल्या आई वडीलासंह शेतात काम करत असताना साधारण अकरा वर्षीय मुलगा हर्षद गणेश काळे (वय-११) पाऊस सुरु झाल्यानंतर त्याच्या अंगावर वीज कडकडाट करत पडली असून त्यात त्याचा भाजून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या प्रकरणी त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यानी मृत घोषित केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत एक दुर्दैवी घटना घडली असून यात एक अकरा वर्षीय बालक हर्षद गणेश काळे हा वीज पडून ठार झाला आहे.त्या सोबत त्याचे आई वडील हाकेच्या अंतरावर शेतीचे काम करत होते.त्याना आपला मुलगा वीज पडून खाली कोसळला असल्याचे पाहून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्याच्या हातावर व तोंडावर जखम झाली होती.व तोंडातून फेस बाहेर पडत असल्याचे दिसून आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील काही भागात तुफान पाऊस झाला.या पावसानं होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे.यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे.या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली त्याला कोपरगाव तालुकाही काही अंशी अपवाद नाही.अशातच आज कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत एक दुर्दैवी घटना घडली असून यात एक अकरा वर्षीय बालक हर्षद गणेश काळे हा वीज पडून ठार झाला आहे.
त्या सोबत त्याचे आई वडील हाकेच्या अंतरावर शेतीचे काम करत होते.त्याना आपला मुलगा वीज पडून खाली कोसळला असल्याचे पाहून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्याच्या हातावर व तोंडावर जखम झाली होती.व तोंडातून फेस बाहेर पडत असल्याचे दिसून आले.त्याच्या नजीकच त्याच्या चुलत्यानी हा आरडा ओरडा पाहून घटनास्थळी धाव घेतली व त्यास जखमी अवस्थेत कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरी वरून कोपरगाव तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद क्रं.४४/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंदणी केली आहे.व पुढील तपास पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.