जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यातून मुलगी पळवली,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीतून दि.१५ सप्टेंबरच्या पहाटे ०२ ते ०५ वाजेच्या दरम्यान आपली मुलगी अज्ञात कोणातरी व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेली असल्याची फिर्याद मुलीच्या चाळीस वर्षीय पित्याने कोपरगाव तालुका पोलीस ठण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शहर व तालुक्यात आठवड्यात एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलिसदेखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,गेल्या साडेचार वर्षांत कोपरगाव शहर व तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले आहे.यामध्ये १४ ते १७ वयोगटातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक असून,या प्रकारचे गुन्हे पालकांसोबत पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत.जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

शहर व तालुक्यात आठवड्यात एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलिसदेखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.

कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.यामध्ये मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.काही वेळा पालक मुलीच्या भविष्यासाठी तडजोड करण्यास तयार होतात.त्यामुळे दाखल केलेले गुन्हे मागेदेखील घेतले जातात. मात्र, यामध्ये पोलिस यंत्रणा कामाला लागते हि बाब वेगळीच.

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे अशीच घटना घडली असून यात फिर्यादी पित्याने या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,आपण व आपली मुलगी आपल्या परिवारासह दि.१४ सप्टेंबरच्या रात्री सर्व नियत कर्म आटोपून झोपी गेलो असता दि.१५ सप्टेंबरच्या पहाटे दोन नंतर ते पहाटे पाच वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलीस फूस लावून पळवून नेले आहे.तिने पळून जाण्यासाठी लोखंडी पाईपचा वापर केल्याचे या गुन्ह्यात स्पष्ट झाले आहे.हि बाब त्यांना सकाळी झोपेतून उठल्यावर समजून आली.त्यांनी याबाबत तातडीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व सहाय्यक फौजदार श्री गवसने यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अज्ञात आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.३३८/२०२१ भा.द.वि.कायदा कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.व्ही.गवसने हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close