गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात दोन कंटेनरचा अपघात,एक जायबंदी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण दहा कि.मी.अंतरावर असलेल्या दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-नागपूर महामार्गावरील चौकात दुपारी एक वाजेच्या सुमारास दोन कंटेनरच्या समोरा समोर झालेल्या धडकेत एका कंटेनरचे मोठे नुकसान झाले असून त्यातील चालक गंभीर जखमी झाला असून तो बेशुद्ध अवस्थेत आहे.त्यामुळे कोपरगाव तालुका पोलिसांना गुन्हे दाखल करणे अवघड बनले आहे.दरम्यान या अपघाताने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.ती काढताना पोलिसांची दमछाक झाली होती.मोठ्या मेहंतीनंतर ती सुरळीत करण्यात आली आहे.
मुंबई-नागपूर महामार्गावर आज दुपारी एक वाजता भीषण अपघात घडला आहे.दोन्ही कंटेनर असून एक कंटेनर हा चंदीगड येथील असून त्याचा क्रमांक सी.जे.०७,सी.ए.५५४४ असा आहे.तर दुसरा कंटेनर हा समृद्धी महामार्गाचा असून त्याचा क्रमांक एम.एच.४३,एच.वाय.१६०२) असा आहे.(मधील सिरीयल नीट बोध होत नाही) त्यातील चालक हा गंम्भीर जखमी झाला असून अद्याप शुद्धीवर आलेला नाही.तो बीड जिल्ह्यातील असल्याचे समजते.
कोपरगाव तालुक्यात वर्तमानात पावसाने चांगलीच हजेरी लावली असून बऱ्याच रस्त्याची वाट लागली आहे.बांधकाम विभाग असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे.अनेक रस्ते मृत्यूचा सापळा बनला आहे.निधीबाबत कोट्यावधीचे उड्डाणे सुरु आहे.मात्र रस्त्याची दुरवस्था दूर होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही.जुना वैजापूर रस्ता,नगर-मनमाड,तळेगाव मार्गे संगमनेर जवळके मार्गे शिर्डी ते ओझर विमानतळ रस्ता हि याची निवडक उदाहरणे आहे.त्याला मुंबई-नागपूर हा रस्ताही अपवाद नाही.सध्या याही रस्त्याची वाट लागली आहे.त्यामुळे रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.जीविताबरोबर नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर वित्तीय नुकसान होत आहे.अशीच घटना आज दुपारी मुंबई-नागपूर महामार्गावर आज दुपारी एक वाजता घडली आहे.दोन्ही कंटेनर असून एक कंटेनर हा चंदीगड येथील असून त्याचा क्रमांक सी.जे.०७,सी.ए.५५४४ असा आहे.तर दुसरा कंटेनर हा समृद्धी महामार्गाचा असून त्याचा क्रमांक एम.एच.४३,एच.वाय.१६०२) असा आहे.(मधील सिरीयल नीट बोध होत नाही) त्यातील चालक हा गंम्भीर जखमी झाला असून अद्याप शुद्धीवर आलेला नाही.तो बीड जिल्ह्यातील असल्याचे समजते.या अपघातात चालकाचे दोन्ही पाय गेले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.त्यामुळे गुन्हा दाखल करताना रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिसांना अडचण येत असल्याची माहिती पोलिसी सूत्रांनी दिली आहे.तर दुसऱ्या कंटेनरमधील चालक व वाहक सुदैवाने बचावले आहेत.जखमी चालकाचे नाव समजू शकले नाही.