जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगांवात मोफत सर्व रोग निदान शिबीर संपन्न

जाहिरात-9423439946

कोपरगांवात मोफत सर्व रोग निदान शिबीर संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथे साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा शाखा क्रं ३,श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीर आज सकाळी नऊ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.या शिबिराचे उदघाटन डाॅ कृष्णा फुलसौंदर यांच्या हस्ते करण्यात आले.

“सदर शिबिरात २०० पेक्षा आधिक नागरिकांनी सहभाग नोदविला आहे.या शिबिरामध्ये ९० ते १०० नागरिकांची मधुमेह तपासणी तसेच ५० ते ६० नागरिकांची ईसीजी तपासणी मोफत करण्यात आली.डोळे तपासणी,हाडांचे आजार आदी आजारांच्या तपासण्या व उपचार या ठिकाणी करण्यात आले असून सर्व शिबिरार्थी रूग्णांना मोफत गोळ्या औषधे दिल्या आहेत”कलविंदर दडियाल,अध्यक्ष कोपरगाव शहर शिवसेना.

या शिबिरासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौंदर,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.जिया शेख,दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,माजी नगरसेवक दिनार पद्मकांत कुदळे उद्योजक,एस.टी.कामगार सेनेचे अध्यक्ष भरत मोरे,विधानसभा संघटक अस्लम शेख,श्री.जी कम्युटरराईज ब्लड लॅबचे संचालक डॉ.नरेंद्र भट्टड,वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इरफान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पोलिस निरिक्षक वासुदेव देसले म्हणाले की,”आरोग्य शिबिरे सामान्य व्यक्तीसाठी महत्वाची आहेत.वेळेवर आजाराचे निदान झाल्यास गरिबांना याचा निश्चित फायदा होईल.नागरिक लोकसेवेसाठी एकत्र येतात हि अभिमानाची गोष्ट आहे.रक्तदान शिबिरालाही महत्व द्यावे असे ते म्हणाले आहे.
डाँ.प्रसाद कातकडे,डाॅ.अमित नाइकवाडे अस्थिरोग तज्ञ ,डाॅ.शंशाक तुसे,डाॅ.निरज काळे,हदय शस्त्रक्रीया तज्ञ,डाँ.दिपक राजगुरु,डाॅ.तेजश्री चव्हाण,नेत्ररोग तज्ञ,डाॅ.विशाल काळे अस्थिरोग तज्ञ,डाॅ.पूजा कातकडे,डाॅ.तुषार सांळुके,डाॅ.प्रशांत सगळगीळे,डाॅ मयूर गंगवाल,डाँ.पठाण मॅडम व्यवस्थापक सचिन जानेवकर,जनसंपर्क अधिकारी महेश रक्ताटे,उत्तम भागवत,सोशल वर्कर विलास कदम अशा तज्ञ डाँक्टरांच्या उपस्थित तपासणी आरोग्य शिबिर संपन्न झाले आहे.ज्या रूग्णांना शस्त्रक्रीया करण्याची आवश्कता आहे.अशा रूग्णांना महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रीयेसाठी संत जर्नादन हाँस्पिटल या ठिकाणी शस्त्रक्रीया होणार आहे.
या कार्यक्रमात शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या शहरप्रमुख पदाचा वर्षपुर्ती सोहळा संपन्न होवुन वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा पुरवणी प्रकाशित करण्यात आली आहे.या कार्यक्रमासाठी सपनाताई मोरे नगरसेविका उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी,वर्षा शिंगाडे नगरसेविका,राखीताई विसपुते शहर प्रमुख महिला आघाडी,अश्विनिताई होने उपशहर प्रमुख महिला आघाडी,विशाल झावरे विक्रांत झावरे ,सुनिल भैय्या तिवारी सचिव युवा सेना विस्तारक शिर्डी लोकसभा,नगरसेवक विरेन बोरावके,डाॅ.अनिरुध्द काळे,राहुल देशपांडे,योगेश मोरे शिव व्यापारी सेना,बाळासाहेब साळुंके शहर संघटक, विकास शर्मा उपशहरप्रमुख,विक्रांत झावरे,राहुल देशपांडे ग्राहक संरक्षण उपशहर प्रमुख,सतीश शिंगाणे,आदी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अस्लम शेख यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close