गुन्हे विषयक
कोपरगावात शहरात शाळेची चोरी,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील मध्यवस्तीत असलेल्या गोदामगल्ली येथील नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक-४ मधील इन्व्हर्टर व बॅटरी असा १७ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने शाळा दुपारी बंद झाल्यानंतर कधीतरी शाळा व्यवस्थापनाची नजर चुकवून डल्ला मारला असून या प्रकरणी फिर्यादी मुख्याध्यापिका शबनम शब्बीर शेख (वय-४७) रा.ओमनगर यांनी नुकताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोना कालखंडात अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे भुरट्या चोऱ्यांत कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.पाकिटमारी,पर्स पळवणे आदी गुन्हे वाढले असून अशीच घटना कोपरगाव शहरात नुकतीच घडली आहे.दि.०७ सप्टेंबर रोजी दुपारी शाळा व्यवस्थापनाने उर्दू शाळा क्रमांक-४ हि बंद केल्यावर नजर चुकवून चोरट्याने ईंव्हर्टरवर डल्ला मारला आहे.
कोरोना कालखंडात अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे भुरट्या चोऱ्यांत कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.पाकिटमारी,पर्स पळवणे आदी गुन्हे वाढले असून अशीच घटना कोपरगाव शहरात नुकतीच घडली आहे.दि.०७ सप्टेंबर रोजी दुपारी शाळा व्यवस्थापनाने उर्दू शाळा क्रमांक-४ हि बंद केल्यावर सर्व शाळा मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी आपापल्या घरी गेले असता त्यांच्यावर पाळत ठेवून अज्ञात चोरट्याने रात्री कधीतरी कोणाचे लक्ष नाही हि संधी साधत शाळेतील १२ हजार रुपये किमतीची बॅटरी व ०५ हजार रुपयांचे इन्व्हर्टर असा एकूण १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.या प्रकरणी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता मुख्याध्यापक शाळेवर आल्यावर झाला प्रकार त्यांच्या लक्षात आला आहे.त्यांनी या प्रकरणी तात्काळ कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली आहे.
कोपरंगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२७५/२०२१ भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.