जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावच्या आमदारांनी शेतकऱ्यांचे आंदोलन मोडले हि दुर्दैवाची बाब –अॅड. संजीव भोर

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )
शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी उभारलेले ऐतिहासिक आंदोलन कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा या गावातून सुरु झाले. शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळवून देणे हे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असतांना तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत हे शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढले हि अतिशय दुर्दैवी बाब असून कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधी निष्क्रिय असून कोपरगावला गतवैभव आशुतोष काळेच प्राप्त करून देऊ शकतात त्यासाठी २१ तारखेला आशुतोष काळे मोठ्या मतधिक्यांनी विजयी करा असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड. संजीव भोर यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी या सभेतमार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,सभेचे अध्यक्ष माजी आमदार अशोक काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,लताताई शिंदे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, कपिल पवार, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, संतोष डागा, शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, माधवराव माळी, संभाजी काळे, नगरसेवक मेहमूद सय्यद, डॉ. अजय गर्जे, निर्मला मालपाणी,. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक, पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती, सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य व राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे पदाधिकारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासनाला शेतकऱ्यांचे प्रश्न व अडचणी याची जाणीव नाही . भाजप शासनाने दिलेली कर्जमाफी हि फसवी कर्जमाफी असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम या सरकारने केले आहे. या सरकारने शेतकरी उद्योजक देशोधाडिला लावले असून सर्वसामान्य माणसाला उध्वस्त केले आहे. शरद पवार यांचे कर्तुत्व मोजता येऊ न शकणारं आहे. वयाच्या ८० व्या वर्षी पवार यांनी शेतकरी व सर्वसामान्य माणसांकरिता संघर्ष करीत आहे. समृध्द तालुके म्हटले की कोपरगाव व श्रीरामपूर या तालुक्यांचे नाव घेतले जायचे. मात्र कोपरगाव तालुक्यात आज अतिशय भीषण परिस्थिती आहे-भोर

त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि,म्हणाले की, शासनाला शेतकऱ्यांचे प्रश्न व अडचणी याची जाणीव नाही . भाजप शासनाने दिलेली कर्जमाफी हि फसवी कर्जमाफी असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम या सरकारने केले आहे. या सरकारने शेतकरी उद्योजक देशोधाडिला लावले असून सर्वसामान्य माणसाला उध्वस्त केले आहे. शरद पवार यांचे कर्तुत्व मोजता येऊ न शकणारं आहे. वयाच्या ८० व्या वर्षी पवार यांनी शेतकरी व सर्वसामान्य माणसांकरिता संघर्ष करीत आहे. समृध्द तालुके म्हटले की कोपरगाव व श्रीरामपूर या तालुक्यांचे नाव घेतले जायचे. मात्र कोपरगाव तालुक्यात आज अतिशय भीषण परिस्थिती आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. बाजारपेठ उध्वस्त झाल्या आहेत त्यामुळे कोपरगाव तालुक्याची गणना आता दुष्काळी तालुक्यात होऊ लागली आहे. दुष्काळी परिस्थिती असूनही कोपरगाव तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात सामावेश होत नाही त्यावेळी लोकप्रतिनिधी काय करतात असा उद्दिग्न सवाल विचारून हि परिस्थिती बदलण्यासाठी आशुतोष काळे यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close