जलसंपदा विभाग
निळवंडे कालव्यांना निधी…या नेत्यांचा सत्कार संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माजी खा.प्रसाद प्रसाद तनपुरे यांच्या सहकार्याने गत दोन वर्षात त्यांनी ०१ हजार ०५६ कोटींचा निधी दिल्याने त्यांचा निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने पत्रकार नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच सत्कार करण्यात आला आहे.
“माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी निळवंडे कालवा कृती समितीच्या मागणीला प्रतिसाद देत राज्यातील आघाडी सरकारचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कडून दोन वर्षात अनुक्रमे गत वर्षी ४९१ कोटी तर दोन महिन्यांपूर्वी ग्रामीण विकास बँक (नाबार्ड कडून) २०० कोटी मंजूर केले होते.तर नुकताच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात ३६५ कोटींचा निधी मंजूर केला आहे त्यामुळे हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होत आहे”-रुपेंद्र काले,अध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.
गत ५२ वर्षांपासून प्रलंबित असलेला निळवंडे प्रकल्पाचा लढा निळवंडे कालवा कृती समितीने केंद्रीय जल आयोगातून सतरा मान्यता मिळवल्या होत्या.या शिवाय रस्त्यावरील लढा लढताना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अड्.अजित काळे यांच्या मदतीने नेला त्यामुळे निळवंडे कालव्यांना छुपा विरोध असणाऱ्या शक्तींना नमवणे सोपे गेले हा प्रकल्प कोरोना काळातही सुरु ठेवावा लागला.यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलेली सर्वाधिक निधीची तरतूद केली आहे.हे करण्यासाठी माजी खा.प्रसाद तनपुरे व त्यांचे सुपुत्र राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निर्णायक भूमिका निभावली आहे.
माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी निळवंडे कालवा कृती समितीच्या मागणीला प्रतिसाद देत राज्यातील आघाडी सरकारचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कडून दोन वर्षात अनुक्रमे गत वर्षी ४९१ कोटी तर दोन महिन्यांपूर्वी ग्रामीण विकास बँक (नाबार्ड कडून) २०० कोटी मंजूर केले होते.तर नुकताच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात ३६५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.या खेरीज राज्य सरकारच्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कालवा कृती समितीस मंत्रालयात संपन्न झालेल्या दि.२९ ऑक्टोबर २०२० च्या बैठकीत दिलेल्या अश्वासना प्रमाणे या कालव्याना निधी कमी पडू देणार नाही हे आश्वासन दिले होते.ते आज अखेर पाळले असून त्यांनी दोन वर्षात जवळपास ०१ हजार ०५६ कोटींचा निधी दिला आहे.त्यामुळे या प्रकल्पाच्या अपेक्षित कामाला वेग आला आहे.व निर्धारित वेळेत हे काम पूर्ण होणार आहे.
त्यामुळे त्यांचे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी माजी.खा.तनपुरे यांचा राहुरी येथील निवासस्थांनी जाऊन सत्कार केला आहे.व आभार मानले आहे.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,उपाध्यक्ष एस.यू.उऱ्हे सर,ज्ञानदेव हारदे,जनमंगल ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव थोरात,गोरक्षनाथ शिंदे,सोपान थोरात,चंद्रकांत थोरात,रवींद्र थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.