जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात कांदा लागवडीच्या कारणावरून मारहाण,चौघांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पूर्वेस सुमारे बारा की.मी.अंतरावर असलेल्या पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या व संवत्सर येथे कसत असलेल्या शेतात आपण व आपले कुटुंबीय कांदा लागवड करत असताना आरोपी रमेश भाऊसाहेब रानवडे,ज्ञानेश्वर बाबुराव रानवडे,सोपान बाबुराव रानवडे,सुनील ज्ञानेश्वर रानवडे यांनी आपल्याला हातातील काठीने डोक्यावर व लाथाबुक्यांनी मारून गंभीर जखमी केल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.

वर्तमानात खरीप पिकांचा हंगाम सुरु असून शेतकरी आपल्या शेतात खरिपाची कामे करीत आहेत.काही जण कांदा लागवडीची कामे करता असून त्यातून वादविवाद उपस्थित होत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत घडली असून या ठिकाणी फिर्यादी महिला निर्मला कुमोद जगताप (वय-४५) या याच शिवारातील गट क्रमांक ३९७/१ हा कसण्यासाठी घेतलेला आहे त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.

सदरचे सविस्तर्व वृत्त असे की,वर्तमानात खरीप पिकांचा हंगाम सुरु असून शेतकरी आपल्या शेतात खरिपाची कामे करीत आहेत.काही जण कांदा लागवडीची कामे करता असून त्यातून वादविवाद उपस्थित होत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत घडली असून या ठिकाणी फिर्यादी महिला निर्मला कुमोद जगताप (वय-४५) या याच शिवारातील गट क्रमांक ३९७/१ हा कसण्यासाठी घेतलेला आहे.त्या क्षेत्राचा कसण्यावरून वादविवाद सुरु आहे.वर्तमानात त्या ठिकाणी फिर्यादी महिला हि कांदा लागणीचे काम करत होती.त्याला मूळ मालकाने हरकत घेतली त्यावरून त्यांनी दि.रविवार दि.०८ ऑगष्ट रोजी सकाळी ०८.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरासमोर असलेल्या ओट्यावर जारून “या शेतात तुम्ही कांदा लागण करू नका” असे म्हणून त्यां दोन कुटुंबात भांडण उदभवले असून या प्रकरणी फिर्यादी महिलेला आरोपी रमेश भाऊसाहेब रानवडे,ज्ञानेश्वर बाबुराव रानवडे,सोपान बाबुराव रानवडे,सुनील न्यानेश्वर रानवडे यांनी आपल्याला हातातील काठीने डोक्यावर व लाथाबुक्यांनी मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी फिर्यादी महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेत फिर्यादी महिला जखमी झाली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२९६/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.टी.चव्हाण हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close