जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

मंदिरातील दानपेटी फोडली प्रकरण,चोरटे चलचित्रफितीत जेरबंद,कोपरगाव तालुक्यात,शोध सुरु

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चांदेकसारे येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरातील दान पेटी अज्ञात चोरट्यानी पळविली असल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.मात्र संबंधित मंदिरातील चलचित्र फितीत हे चोरटे जेरबंद झाले असल्याने लवकरच त्यांचा शोध लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

“कोरोना साथीच्या कालखंडात चोरट्यानी आपली हाथ की सफाई दाखविण्यास प्रारंभ केला असला तरी या घटनेतील चोरटे चलचित्र फितीत जेरबंद झाले असल्याने ते लवकरच जेरबंद होण्यास मदत होणार आहे.चोरट्यांना आपण कदापि सोडणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल यावर जंनतेने विश्वास ठेवावा”-दौलतराव जाधव,पोलीस निरीक्षक,कोपरगाव तालुका पोलीस ठाणे.

संगमनेर-कोपरगाव रस्त्यानजीक दक्षिण बाजूस चांदेकसारे येथील जोगेश्वरी भैरवनाथाच्या दर्शनासाठी नेहमीच भाविकांची गर्दी असते.या ठिकाणी भाविक आपल्या सदिच्छेने दानधर्म करत असतात.सोमवार दि.०९ ऑगष्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी जोगेश्वरी भैरवनाथ मंदिराची दानपेटी पळविली असल्याचे सकाळी भाविक दर्शनासाठी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले होते.कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.व संबंधित दानपेटी दूरवर एका ठिकाणी सापडली आहे.चोरटे तेथे मंदिरात असलेल्या चलचित्रफितीती जेरबंद झाले आहे.त्यानीं दानपेटीचे कुलूप तोडून आतील ऐवज चोरट्यानी लंपास केला आहे.त्यामुळे गावातील ग्रामस्थांना हि बातमी कळाली तेंव्हा नागरिकांत खळबळजनक उडाली आहे.माजी उपसरपंच केशव होन,जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष भास्कराव होन,सुधाकर होन,सागर होन चांदेकसारेचे पोलीस पाटील मिराताई रोकडे, रावसाहेब होन,डाॅ.गोरक्षनाथ रोकडे,राहुल होन,सुनिल होन,दादासाहेब होन,रविंद्र होन,नितीन होन,बाबासाहेब होन,सत्यवान होन यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी करत कोणत्याही क्षणाचा विलंब न करता कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याला ही खबर कळविली.त्यानंतर तत्काळ तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.याबाबत मधुकर शिवाजी होन यांच्या फिर्याद दाखल केली आहे.नुसार सोमवार दि ९ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११ वाजेनंतर ते मंगळवार दि १० ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ७ वाजे दरम्यान चांदेकसारे येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरातील दहा हजार रुपये किंमतीची दान पेटी व त्यातील अंदाजे पंचवीस हजार रुपये किमतीचा रोकड असा एकूण ३५००० रुपये चा मुद्देमाल चोरी झाला असल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं. २९८/२०२१ नुसार भां.द.वी.कलम ३७९ प्रमाणे दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए.कुसारे हे करत आहे.अद्याप पोलिसांना या चोरट्यांना शोधण्यात यश आलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close