कोपरगाव तालुका
कोपरगावात ‘हेल्पिंग हँड्स’ मार्फत विद्यार्थ्यांना करणार मदत-कृती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना साथीच्या कालखंडात आर्थिक गरजू विद्यार्थ्यांना या वर्षीही कोपरगाव शहरातील हेल्पिंग हँड्स हि संस्था मदत करणार असल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष व लेखा परीक्षक दत्तात्रय खेमनर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
‘हेल्पिंग हँड्स’ हि संस्था मूळ तालुक्यातील वेस येथील रहिवासी असलेले लेखा परीक्षक दत्तात्रय खेमनर यांनी स्थापन केली असून त्यांनी दुष्काळी परिसरातील असूनही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण केले आहे.निळवंडे धरणाच्या प्रस्तावित लाभक्षेत्रातील व दुष्काळी भागातील पहिले लेखा परीक्षक (सी.ए.)आहे.आपल्या सारखी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण करताना गरजू विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये हा उदात्त हेतू त्या मागे आहे.
कोपरगाव शहरातील हेल्पिंग हँड्स हि संस्था मूळ तालुक्यातील वेस येथील रहिवासी असलेले लेखा परीक्षक दत्तात्रय खेमनर यांनी स्थापन केली असून त्यांनी दुष्काळी परिसरातील असूनही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण केले आहे.निळवंडे धरणाच्या प्रस्तावित लाभक्षेत्रातील व दुष्काळी भागातील पहिले लेखा परीक्षक (सी.ए.)आहे.आपल्या सारखी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण करताना गरजू विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये हा उदात्त हेतू त्या मागे असून त्यांनी हा उपक्रम अनेक वर्षांपासून सुरू ठेवलेला आहे.यावर्षीही त्यांनी हा उपक्रम सुरु ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे.त्या बाबत त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
त्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”या वर्षी आपण हेल्पिंग हँड्स या आपल्या संस्थेतर्फे उच्च शिक्षणा साठी ज्या जुन्या १७ मुलांचे शिक्षण चालू आहे.त्या मुलांना महाविद्यालयीन शुल्क भरण्यासाठी साधारणपणे प्रत्येकी रूपये २० हजार रुपये या प्रमाणे मदत करणार आहोत.जर कार्यक्रमास परवानगी मिळाली तर आपण छोटेखाणी फक्त ५० लोकांमध्ये कार्यक्रम करण्याचे नियोजन करत आहोत.व नवीन १५ मुलांना ज्यांना १२ वीला ६०% पेक्षा जास्त गुण आहेत व ज्यांची घरची परिस्थिती गरिबीची आहे व ज्यांना १ वर्षाच्या आतील व्यावसायिक कोर्स करून पुढील शिक्षण “कमवा व शिका” या पद्धतीने करावयाचे आहे अशा १५ मुलांना कोर्स फी,हॉस्टेल फी किंवा मेस बील भरणेसाठी प्रत्येकी रु १० हजारांची मदत करणार आहोत. म्हणजे या वर्षी आपली मदत एकूण ३२ मुलांसाठी एकूण रुपये ४ लाख ९० हजार खर्च करण्यात येणार असल्याची माहितीही हेल्पिंग हँड्सचे अध्यक्ष व लेखा परीक्षक दत्तात्रय खेमनर यांनी शेवटी दिली आहे.