जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शेतबांधावरून जाण्याच्या कारणावरून मारहाण,कोपरगावात तिघांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस साधारण बावीस कि.मी.अंतरावर असलेल्या हांडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादीच्या घरातील महिला शेताच्या बांधावरून जात असताना रविवार दि.०८ ऑगष्ट रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास त्याला त्याच गावातील आरोपी सुधीर दत्तात्रय घुमरे,विठ्ल रंगनाथ घुमरे,श्रीपाद रंगनाथ घुमरे यांनी हरकत घेऊन फिर्यादी भाऊसाहेब संपत मोरे (वय-७३) व त्यांचा पुतण्या दिलीप अंबादास मोरे,सुनील भाऊसाहेब मोरे यांना बांबूच्या व दगडाच्या सहाय्याने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

रविवार दि.०८ ऑगष्ट रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरातील महिला हि गट.क्रं.१८ वरील बांधाने आपल्या शेतात आपल्या नियत कामासाठी जात असताना त्याला आरोपी सुधीर दत्तात्रय घुमरे,विठ्ल रंगनाथ घुमरे,श्रीपाद रंगनाथ घुमरे यांनी हरकत घेतली त्यावरून हा तंटा उदभवला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी भाऊसाहेब मोरे व त्यांचे बांधभाऊ सुधीर घुमरे यांचे जमिनी शेजारी-शेजारी आहे.रविवार दि.०८ ऑगष्ट रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरातील महिला हि गट.क्रं.१८ वरील बांधाने आपल्या शेतात आपल्या नियत कामासाठी जात असताना त्याला आरोपी सुधीर दत्तात्रय घुमरे,विठ्ल रंगनाथ घुमरे,श्रीपाद रंगनाथ घुमरे यांनी हरकत घेतली व त्याचा जाब या महिलेच्या घरातील सदस्यांना विचारला यातून हि दुर्दवी घटना घडली आहे.यावर त्याच गावातील वरील तिघा आरोपींनी फिर्यादी भाऊसाहेब संपत मोरे (वय-७३) व त्यांचा पुतण्या दिलीप अंबादास मोरे,सुनील भाऊसाहेब मोरे यांना बांबूच्या व दगडाच्या सहाय्याने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

दरम्यान या घटनेबाबत कोपरगाव तालुका पोलिसानी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२९७/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विलास कोकाटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close