जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलीस पळवले,कोपरगाव तालुक्यातील आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत्तील रहिवाशी असलेली तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी त्याच गावातील एका अठरा वर्षीय सज्ञान तरुणाने नुकतीच पळवली होती त्या बाबत मुलीच्या पित्याने (वय-४५) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा केला होता.त्या आरोपीला तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याला कोपरगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दि.२० जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान कोणा तरी अज्ञात इसमाने कुंभारी येथून आपल्या मुलीस अज्ञात करणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले होते.मात्र संबंधित मुलगी त्याच गावातील तरुणाने पळवून नेली असल्याचे उघड झाले होते.तिला नंतर त्याच्याकडून ताब्यात घेतले होते व आरोपीस जेरबंद केले होते.त्यास कोपरगाव तालुका पोलिसांनी जिल्हा वसत्र न्यायाधीश श्री कोराळे यांच्या समोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची कोठडी सूनावली आहे.

सदरचे सवित्तर वृत्त असे की,फिर्यादी मुलीच्या पित्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आपली मुलगी हरविल्याच्या फिर्याद दाखल केली होती.मात्र त्या नंतर त्यांना हि घटना गावातीलच एका तरुणाने पळवून नेली असल्याचे समजले होते.त्यात त्यांनी म्हटले होते की,दि.२० जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान कोणा तरी अज्ञात इसमाने आपल्या मुलीस अज्ञात करणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे.असा गुन्हा त्या मुलीच्या पित्याने दाखल करण्यात आला होता.त्यात कोपरगाव तालुका पोलिसांनी वाढीव कलम ३७६,३६६ सह पोस्को कायदा कलम ४,१८,१२, हे लावण्यात आले होते.घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित आरोपीला अटक करून संबंधित मुलगी त्याच्या ताब्यातून मिळवली होती.व आरोपीला अटक केली होती.व त्यास कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री कोराळे यांच्या समोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांस दि.०२ ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सरकारी पक्षाच्या वतीने अड्.अशोक वहाडणे यांनी तर आरोपीच्या अड्.विद्यासागर शिंदे यांनी काम पाहिले त्यांना अड्.सूयोग जगताप यांनी सहकार्य केले आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close