जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावातील ‘त्या’ गुंह्यातील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या व मूळ माहेर सिन्नर तालुक्यातील लिंगटांगवाडी असलेल्या व पाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नव विवाहितेस,”आपल्या माहेराहून नवीन घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावे” या मागणीसाठी तिला वेळोवेळी मारहाण,शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ करून पूजा मेहेत्रे या नवविवाहितेस पेटवून दिल्याच्या गुंह्यातील आरोपी पती निखिल विलास मेहेत्रे व तिचा सासरा,सासू,दोन दीर,जाव आदी सहा जणांना आज कोपरगाव शहर पोलिसानी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.

कुंभारी येथील रहिवासी असलेल्या व पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पूजा मेहेत्रे या महिलेला तिच्याच सासरच्या लोकांनी पेटवून दिल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्या सर्व आरोपींना अटक केली होती.त्यांना नुकतेच कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यांना ०३ ऑगष्ट पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.दरम्यान या घटनेत वस्तुस्थिती मात्र वेगळीच असल्याची माहिती उपलब्ध होत असून याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

हुंडा प्रथेसारख्या दुष्ट रुढीला आळा बसावा आणि निरपराध विवाहित स्त्रियांचा छळ व हुंडाबळी थांबावे यासाठीचा कायदा १ जुलै १९६१ रोजी लागू झाला.हे जरी वास्तव असले तरी आजही हुंड्याची अनिष्ट प्रथा बंद किंवा कमीही झाली नाही.आजही महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी दोनशेपेक्षा अधिक हुंडाबळी अधिकृतपणे नोंदवले जातात.या संबंधी कायदा कडक असूनही हुंडाबळी वाढतच आहेत.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत दि.२६ जुलै रोजी सकाळी ०९.३० वाजेच्या सुमारास घडली असून यासंबंधी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मयत विवाहित तरुणीने आपल्या माहेराहून दोन नवीन घरे बांधण्यासाठी व संसारोपयोगी चीजवस्तू आणण्यासाठी तिने दोन लाख रुपये आणावे या करिता तिला दि.१६ फेब्रुवारी २०२१ रोजी लग्न झाले पासून तिचा शारीरिक,मानसिक,त्रास देऊन,शिवीगाळ करून तिला दि.२६ जुलै रोजी सकाळी ०९.३० वाजेच्या सुमारास मारहाण करून पेटवून दिले असल्याचे तिच्या पित्याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.तिला जखमी अवस्थेत लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तिचे तिथे दि.२८ जुलै रोजी उपचार सुरु असताना निधन झाले होते.या प्रकरणी मयत महिलेचे पिता पांडुरंग रामभाऊ लोंढे रा.लिंगटांगवाडी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आरोपी नवरा निखिल मेहेत्रे,सासरा विलास निवृत्ती मेहेत्रे,सासू लता विलास मेहेत्रे,दोन दीर आशिष मेहेत्रे,स्वप्नील मेहेत्रे,जाव रेखा स्वप्नील मेहेत्रे सर्व रा.कुंभारी याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली होती.त्यांना नुकतेच कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यांना ०३ ऑगष्ट पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपींच्या वतीने वकिलांनी बाजू मांडली यांनी सहाय्य केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close