जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तरुण जोडप्यावर विजेरी लावली,तरुणास मारहाण कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील विष्णू चित्र मंदिराजवळ अनोळखी मुलीबरोबर आरोपी बोलत असताना त्यांच्यावर भ्रमणध्वनीची विजेरी लावून पहिले आरोपी नकुल धर्मराज ठाकरे यास राग येवुन त्याने व त्याचे साथीदार दोन अनोळखी मुले अशांनी फिर्यादी व फिर्यादीचा मित्र आकाश राजेंद्र दगडे रा.गोदाम गल्ली कोपरगांव अशांना शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण करुन दुखापत केली असल्याची धक्कादायक घटना घडली असून याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी शुभम संजय सोनवणे (वय-२४) गजानन नगर याने गुन्हा दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

आरोपी नकुल ठाकरे हा व एक अनोळखी मुलगी बोलत उभे असताना तेथे फिर्यादी शुंभम सोनवणे याने त्यांच्यावर आपल्या भ्रमणध्वनीच्या विजेरीतून प्रकाश झोत टाकून त्यांना पहिले असता त्याचा आरोपीस राग आला व त्याने व त्याचे अनोळखी दोन मुले यांनी फिर्यादी सोनवणे व त्याचा मित्र आकाश राजेंद्र दगडे अशांना शिवीगाळ केली व त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.व दुखापत केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरातील मध्यवस्तीत असलेल्या विष्णू मंदिरासमोर व साईबाबा व मुंजोबा मंदिराजवळ दि.२२ जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आरोपी नकुल ठाकरे हा व एक अनोळखी मुलगी बोलत उभे असताना तेथे फिर्यादी शुंभम सोनवणे याने त्यांच्यावर आपल्या भ्रमणध्वनीच्या विजेरीतून प्रकाश झोत टाकून त्यांना पहिले असता त्याचा आरोपीस राग आला व त्याने व त्याचे अनोळखी दोन मुले यांनी फिर्यादी सोनवणे व त्याचा मित्र आकाश राजेंद्र दगडे रा.गोदामगल्ली अशांना शिवीगाळ केली व त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.व दुखापत केली आहे.व फिर्यादीचा एक पाच हजार रुपये किंमतीचा एम.आय.कंपनीचा काळ्या रंगाचा भ्रमणध्वनी व त्यातील भारत संचार निगम कंपनीचे सिम कार्ड आदी हिसकावून नेले आहे.या प्रकरणी फिर्यादी सोनवणे याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.२३०/२०२१ भा.द.वि.कलम ३२७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close