कोपरगाव तालुका
शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
न्यूजसेवाकोपरगाव-(प्रतिनिधी)शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिनांक २२ जुलै पासून सुरु असलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता आज काल्याच्या किर्तनानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते दहिहंडी फोडून झाली आहे. आज उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती झाली.त्यानंतर पहाटे ०५.०० वाजता श्रींना मंगलस्नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली.सकाळी ०६.३० वाजता संस्थानचे मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व त्यांची धर्म पत्नी प्रतिक्षा घोरपडे यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रीं ची पाद्यपुजा करण्यात आली. तर सकाळी ०७.०० वाजता सत्र न्यायाधिश तथा संस्थानचे तदर्थ समिती, अध्यक्ष सुधाकर वेंकटेश्वरराव यार्लगड्डा व त्यांची धर्म पत्नी मालती सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा करण्यात आली.यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, सरंक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी व मंदिर पुजारी उपस्थित होते.सकाळी १०.०० वाजता पुजारी उल्हास वाळुंजकर यांच्या काल्याच्या किर्तनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली. याप्रसंगी संगिता बगाटे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप,मंदिर प्रमुख रमेश चौधरी,सरंक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी व मंदिर पुजारी उपस्थित होते.त्यानंतर १२.१० वाजता श्रीं ची माध्यान्ह आरती झाली. सायंकाळी ०६.०० वाजता संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप व त्यांची धर्मपत्नी प्रतिभा जगताप यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रीं ची पाद्यपुजा करण्यात आली. सायं.०७.०० वाजता धुपारती व रात्रौ १०.३० वाजता श्रीं ची शेजारती झाली आहे.