निधन वार्ता
सोमैय्या महाविद्यालयाचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक श्री सिनगर यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील मूळ रहिवाशी व कोपरगाव शहरातील कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे के.जे.सोमैय्या महाविद्यालयातील सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक मच्छीन्द्र लहानु सिनगर (वय-८३) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात एक मुलगा,मुली,पत्नी असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर भोजडे येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.मच्छीन्द्र सिनगर यांनी सुरुवातीस रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालयात आपली पहिली दहा वर्ष सेवा बजावली होती.त्या नंतर गोदावरी काठच्या के.जे.सोमैय्या महाविद्यालयांत ते दाखल झाले होते.त्यांनी त्या ठिकाणी अनेक वर्ष सेवा बजावली होती.मात्र ऐच्छिक सेवा निवृत्ती स्विकारली होती.त्यांनी आपल्या प्रामाणिक व मितभाषी स्वभावामुळे संस्थाचालक,प्राचार्य,विद्यार्थी,पालक आदींचे मन जिंकले होते.
स्व.मच्छीन्द्र सिनगर यांनी अत्यंत कष्टातून आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण केले होते.त्यांनी सुरुवातीस रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालयात आपली पहिली दहा वर्ष सेवा बजावली होती.त्या नंतर गोदावरी काठच्या के.जे.सोमैय्या महाविद्यालयांत ते दाखल झाले होते.त्यांनी त्या ठिकाणी अनेक वर्ष सेवा बजावली होती.मात्र ऐच्छिक सेवा निवृत्ती स्विकारली होती.त्यांनी आपल्या प्रामाणिक व मितभाषी स्वभावामुळे संस्थाचालक,प्राचार्य,विद्यार्थी,पालक आदींचे मन जिंकले होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचे जेष्ठ बंधू परशराम सिनगर यांचे गतवर्षी निधन झाले होते.त्या नंतर ते मानसिक दृष्ट्या खचले होते.ते कोपरगाव नगर परिषद पाच क्रमांक शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.एस.एम.सिनगर यांचे पती तर जेष्ठ कार्यकर्ते भगवान सिनगर यांचे चुलते होते.
त्यांच्या निधनाने कोपरगाव.भोजडे परिसरात शोककळा पसरली आहे.त्यांच्या निधनाबद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नानासाहेब जवरे,सचिव अड्.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,देविदास ठोंबरे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.