गुन्हे विषयक
पाच लाखासाठी अपहरण,चोवीस तासात पाच ठग अटक तर अन्य गुंह्यातील आरोपी जेरबंद,कोपरगाव पोलिसांची धडक कारवाई
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
मनमाड स्वामी जनार्दन नगर जिल्हा नाशिक येथील रहिवाशी असलेली महिला व तिचा पती आदी राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस स्थानकात असताना पती सचिन वसंत जाधव (वय-३५) यास नाशिक येथील आरोपी महिला प्रमिला पवार हिच्या सांगण्यावरून अनोळखी दोन पुरुष व एक महिला आदी तीन आरोपीनी दि.१५ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या एर्टीगा कार मध्ये बसवून पाच लाख रूपयांसाठी पळवुन नेले असताना त्यांना कोपरगाव शहर पोलिसानी २४ तासाचे आत जेरबंद केले असून त्या आरोपीत एकनाथ हरिभाऊ हडवळे (वय-५४) रा.राजुरी ता.जुन्नर यासह पाच जणांना जेरबंद केले आहे.दरम्यान एकाच दिवशी तीन गुंह्यातील आरोपी पोलिसानी जेरबंद केल्याने शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान दुसऱ्या एका संवत्सर ग्रामपंचायत येथील महावितरण कंपनींच्या गणपती तळ्याच्या शिवारातील वायर चोरीच्या दि.१६ जुलैच्या गुन्हयातील आरोपी कोपरगाव शहर पोलिसानी गुप्त खबरीच्या माध्यमातून आरोपी अशोक उर्फ मुकेश उत्तम बोर्डे यास ताब्यात घेऊन त्याला पोलिसी हिसका दाखवला असता त्याने दुसरा आरोपी भारत मच्छीन्द्र बंसे, (वय-२५) रा.लोणी ता.वैजापूर,शिवा निवृत्ती गायकवाड (वय-३०) रा.हिलालपूर ता वैजापूर अशांना जेरबंद केले आहे.
तिसऱ्या गुंह्यातील फिर्यादी गौरव सत्यनारायण अग्रवाल (वय-४०) यांच्या बांगड्याच्या दुकानातील ७० हजार रुपये चोरीच्या दि.२६ जूनच्या गुन्हयातील आरोपी असिफ नूरखानं सय्यद (वय-३०),मोहसीन मुक्तार पठाण (वय-२६) रा.यशवंत चौक कोपरगाव या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला व आरोपी महिला यांचा काही कारणावरून वाद आहे.दरम्यान फिर्यादी महिला भावना जाधव हि आपल्या पतीसमवेत गुरुवार दि.१५ जुलै २०२१ रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या कोपरगाव आगाराच्या बस स्थानकात पुढे गावी जाण्यासाठी आले असताना त्या ठिकाणी फिर्यादी महिलेचा पती व संबंधित महिला हे बसची वाट पाहत असताना त्या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाची मारुती एर्टीगा हि कार आली व त्यातील अनोळखी दोन पुरुष व एक महिला यांनी फिर्यादी महिलेच्या पतीला जवळ बोलावून घेतले व त्यास ०५ लाख रूपयांसाठी बळजबरी गाडीत घेऊन गेले आहे.वअपहरीत पुरुषाचा भ्रमणध्वनी आपल्या ताब्यात ठेऊन त्यास डांबून ठेऊन मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.व फिर्यादी महिलेला,” तुम्ही पोलिसात तक्रार दिली तर फिर्यादी महिलेच्या पतीला संपवून टाकू” अशी धमकी दिली असल्याचा गुन्हा फिर्यादी महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नुकताच दिला होता.दिल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते.सदर महिला व तिचा पती नेमके कुठे चालले होते.ते कोपरगाव बस आगारात काय करत होते याचा काहीही तपास लागत नव्हता.आरोपी महिला व या महिलेचे काय भांडण आहे.तिच्या पतीला नेण्याचे कारण काय याचा काहीही बोध होत नसल्याने कोपरगाव शहर पोलीस अधिकारी चक्रावुन गेले होते.मात्र या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष गुप्तता पाळली होती.व आपला तपास सुरु केला होता.
याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी आधी आपल्या दप्तरी अज्ञात दोन अनोळखी पुरुष व एक महिला यांचे विरुद्ध गु.र.क्रं.२२२/२०२१ भा.द.वि.लकम ३८७,३६४,(अ) प्रमाणे गुन्हा दखल केला करून घेतला होता.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले हे आरोपींच्या भ्रमणध्वनीवरील लोकेशनवर लक्ष ठेऊन होते.व त्यांना आपण खंडणीची रक्कम घेऊन येत असल्याची बतावणी करून जवळीक दाखवीत होते.व अशी सबब सांगून त्यांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.
त्या आरोपीत एकनाथ हंडवळें सह भाऊसाहेब विठ्ठल काळे (वय-४०) रा.समर्थ नगर आळेफाटा,ता.जुन्नर,प्रवीण रंभाजी खेमनर (वय-२८) रा.आंबोरे ता.संगमनेर.प्रमिला महेश पवार (वय-३५)रा.शिव मल्हार अपार्टमेंट,चेहडी, ता.जिल्हा नाशिक,सीमा भाऊसाहेब काळे (वय-३५) रा.समर्थ नगर आळेफाटा.ता.जुन्नर,आदींना सतत बारा तास सापळा रचून फिर्यादी महिलेला सतत संपर्कात ठेऊन पैशाची व्यवस्था करत असल्याचे सांगून नाशिक पुणे येथे येण्याबाबत कळवीत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान आरोपींकडून ०६ लाखांची एक पांढऱ्या रंगाची मारुती एर्टीगा कार (क्रं.एम.एच.१४ जे.ए.६५७२),०५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा भ्रमणध्वनी,एक तेवढ्याच किमतीचा विव्हो कंपनीचा भ्रमणध्वनी,असा ०६ लाख १० हजार किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
या जोखमीच्या मोहिमेत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेसह पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे,पो.कॉ.जे.पी.थोरात,महिला पोलीस कॉ.पी.बी.बनकर,विजया दिवे,पोलीस नाईक फुरकान शेख,होमगार्ड दीपक गर्जे,आदींनी मोलाची कामगिरी बजावली आहे.त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.
दरम्यान दुसऱ्या एका संवत्सर ग्रामपंचायत येथील महावितरण कंपनींच्या गणपती तळ्याच्या शिवारातील वायर चोरीच्या दि.१६ जुलैच्या गुन्हयातील आरोपी कोपरगाव शहर पोलिसानी गुप्त खबरीच्या माध्यमातून आरोपी अशोक उर्फ मुकेश उत्तम बोर्डे यास ताब्यात घेऊन त्याला पोलिसी हिसका दाखवला असता त्याने दुसरा आरोपी भारत मच्छीन्द्र बंसे, (वय-२५) रा.लोणी ता.वैजापूर,शिवा निवृत्ती गायकवाड (वय-३०) रा.हिलालपूर ता वैजापूर अशांना जेरबंद केले आहे.व त्यांनी गुन्हयात वापरलेली ३० हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची प्लॅटिना दुचाकी (क्रं.एम.एच.२० ए. एक्स.०३१९) व ३५ हजार किमतीची विद्युत वाहक तार जप्त केली आहे.
तर तिसऱ्या गुंह्यातील फिर्यादी गौरव सत्यनारायण अग्रवाल (वय-४०) यांच्या बांगड्याच्या दुकानातील ७० हजार रुपये चोरीच्या दि.२६ जूनच्या गुन्हयातील आरोपी असिफ नूरखानं सय्यद (वय-३०),मोहसीन मुक्तार पठाण (वय-२६) रा.यशवंत चौक कोपरगाव या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले आहे.व त्यांच्या कडून ३३ हजार ४०० रुपयांचा माल जप्त केला आहे.कोपरगाव येथील एकाच दिवशी तीन गुंह्यातील आरोपी जेरबंद केल्याने कोपरगाव शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.