जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

‘त्या’ तरुणीचा मृत्यू हुंडाबळीचा,कोपरगावात चौघांवर गुन्हा,चार दिवसांची पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायत शिवारात दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या व मढी बुद्रुक येथील माहेर असलेल्या तरुणी राणी किरण चंदनशिव (वय-१९) हे काल पहाटे पाच वाजेच्या सुमारास शव पाण्यात तरंगताना आढळून आल्याने धारणगाव शिवारात खळबळ उडाली होती.दरम्यान हि घटना हुंडाबळीची असण्याची शक्यता आमच्या प्रतिनिधीने सर्वात प्रथम वर्तविली होती ती खरी ठरली असून या प्रकरणी मयत विवाहित तरुणीचे वडील दत्तात्रय तुकाराम साठे (वय-४५) रा.मढी बुद्रुक यांनी आरोपी नवरा किरण साहेबराव चंदनशीव,सासरा साहेबराव जगन्नाथ चंदनशिव,सासू विठाबाई उर्फ मंदा साहेबराव चंदनशिव,दीर लक्ष्मण साहेबराव चंदनशिव आदी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक केली असून त्यांना आज कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या गुन्ह्याच्या कलमात बदल केला असून नवरा,सासू,सासरे,दीर आदी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीना अटक केली असून त्यांना कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,राणी चंदनशिव या तरुणीचे लग्न तीन महिन्यांपूर्वी दि.२२ एप्रिल रोजी धारणगाव येथील तरुण किरण चंदनशिव याचे बरोबर कोरोना काळात निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत संपन्न झाले होते.सदर तरुण हा नाशिक जिल्ह्यातील बजाज फायनास या खाजगी कंपनीत नोकरी करत असून त्यास नाशिक येथे राहण्यासाठी घर घेण्याची इच्छा होती.त्यातून त्याने आपल्या पत्नीला आपल्या माहेराहून पन्नास हजार रुपये आणावे या साठी दबाव आणला होता.यातून या तरुणीचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरु झाला होता.ती घटना घडण्याच्या आधी काही दिवस माहेरी गलेली होती.दोन दिवसपूर्वी ती सासरी आली होती.लग्नात कबूल केलेला पन्नास हजार रुपयांचा हुंडा दिला नाही,लग्न चांगले केले नाही.म्हणून हा शारीरिक,मानसिक छळ सूरु होता.त्या छळा मूळे ती आजारी पडली होती.अचानक तिचा मृतदेह हा गोदावरी नदीत दि.०८ जुलै रोजी सकाळी पाच वाजता आढळून आला होता.तोही तिच्या नदीकाठी ठेवलेल्या भ्रमंध्वनिवरून उघड झाला होता.वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मृत्यू बाबतचा अहवाल आलेला असून तिचा मृत्यू हा पाण्यात पडून झाला असल्याचे समजते.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आधी अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तकात क्रं.-२६/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.मात्र त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी बदल करून गु.र.क्रं.२६०/२०२१ भा.द.वि.कलम ४९८(अ),३०४,(ब) ३४ प्रमाणे चारही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शिर्डी उपविभागीय अधिकारी श्री सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close