जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यातील तरुणांचा खून,दोन आरोपींवर गुन्हा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील तरुण व ट्रॅक्टर मालक महेश सोन्याबापू मलिक (वय-३२) रा.कासली याचे आपल्या पत्नीच्या चारित्र्यावरून ट्रॅक्टरचा चालक व आरोपी चेतन बापू आसने यांचेशी काही महिन्यांपूर्वी वाद झाले होते.त्यातून आरोपी हा फरार झाला होता.मात्र परवा तो त्याच्या गावात आल्याची भणक मयत महेश मलिक याला लागून तो त्याचा जाब विचारण्यासाठी पढेगाव येथे त्याच्या घरी गेला असता आरोपी चेतन बापू आसने व त्याचा भाऊ केशव बापू आसने यांनी कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला असल्याची माहिती हाती आली आहे.व त्याचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील जंगलात फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघड झाली असून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून मृतदेह जंगलातून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मयत ट्रॅक्टर मालक महेश मलिक व त्याचा चालक यांचा पत्नीशी अनैतिक कारणाच्या संशयावरून भांडण झाले होते.त्या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक चेतन आसने हा नाशिक कडे फरार झाला होता.मात्र काल दि.०१ जुलै रोजी मयत मलिक यास फरार झालेला त्याचा चालक हा घरी आलेला आहे याची पक्की खबर मिळाली होती.व तो त्याचा जाब विचारण्यासाठी रात्री ०९ वाजेच्या सुमारास घरी गेला असता.त्याच्यात बाचाबाची होऊन त्यातून आरोपी चेतन आसने याने एका क्षणी त्याच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून त्याला ठार केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत तरुण हा महेश मलिक हा ट्रॅक्टरचा मालक असून त्याच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून पढेगाव येथील रहिवाशी असलेला चेतन आसने हा काम करत होता.त्यामुळे त्याचे कासलीत मलिक मयत यांच्या घरी नेहमी येणें जाणे होते.त्यातून मयताची पत्नी व ट्रॅक्टरचा चालक आसने याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.त्यांना एकदा या प्रकरणी रंगेहात पकडले असल्याचा संशय आहे.त्यातून या दोघांचा बेबनाव निर्माण झाला होता.त्या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक चेतन आसने हा नाशिक कडे फरार झाला होता.मात्र काल दि.०१ जुलै रोजी मयत मलिक यास फरार झालेला त्याचा चालक हा घरी आलेला आहे याची पक्की खबर मिळाली होती.व तो त्याचा जाब विचारण्यासाठी रात्री ०९ वाजेच्या सुमारास घरी गेला असता.त्याच्यात बाचाबाची होऊन त्यातून आरोपी चेतन आसने याने एका क्षणी त्याच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून त्याला ठार केले असून या कामी त्याला भाऊ केशव आसने यांने मदत केली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.या घटनेनंतर आरोपीने तो नाशिकहून ज्या महिंद्रा पीकअपमधून आला होता.त्याच गाडीत त्याचा मृतदेह घेऊन त्याचा पुरावा नष्ठ करण्यासाठी त्याने त्र्यंम्बकच्या पुढे असलेल्या म्हसरुळच्या जंगलात फेकून दिले होते.

या घटनेनेनंतर मयत तरुणाच्या आई सुनीता सोन्याबापू मलिक (वय-५२) हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली की,तिच्या सुनेवर म्हणजेच मयत मुलाच्या पत्नीवर आरोपी चेतन आसने याची वाईट नजर होती.त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकले होते.त्याचा राग मनात धरून वरील दोन आरोपीनी त्यास मारहाण करून त्याचे पिकअप गाडीतून अपहरण केले आहे.

या गुन्ह्यावरून पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२४९/२०२१ भा.द.वि.कलम ३६४,३२३,३४ प्रमाणे वरील दोन आरोपींवर दि.०२ जुलै रोजी ०३.२८ वाजता गुन्हा दाखल केला होता.त्यावरून पोलिसानी तपास सुरु केला असता व आरोपीचे मोबाईल लोकेशन तपासून कारवाई सुरु केली व त्यास रात्री अटक केली असून त्याला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी हिसका दखवताच त्याने मयत तरुणांच्या प्रेताची लावलेली विल्हेवाट दाखवून दिली असून आज दुपारी दोनच्या सुमारास तो मृतदेह म्हसरुळच्या जंगलातून ताब्यात घेतला असून पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली असून उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close