गुन्हे विषयक
कोऱ्हाळेंतील खुनाचे आरोपी अखेर जेरबंद,पोलीस अधीक्षकांचा खुलासा
न्यूजसेवा
साकुरी-(किशोर पाटणी)
शिर्डी राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या २५ जूनच्या मध्यरात्री शशिकांत चांगले (वय-६०) सिंधूबाई चांगले (वय-६०) या दोघांचा अज्ञात कारणावरून फावड्याच्या साहाय्याने केलेल्या खुनातील आरोपी जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या काही तासात जेरबंद केले असून यात कोपरगाव तालुक्यातील आरोपींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.या खुनाच्या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून दोन जण फरार झाले आहे.हा दरोडा केवळ लुटमारीसाठी केला आसल्याचे त्यामुळे उघड झाले आहे.पोलिसांच्या या तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान या गुन्ह्या बाबत आमच्या प्रतिनिधीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”या तपासात गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत हि शेवगाव तालुक्यातील आगवने येथील दरोड्याशी व नाशिक जिल्ह्यातील दरोड्याशी साधर्म्य सांगणारी असल्याने आम्हाला गुन्हेगार कोण असावे याचा कयास बांधता आल्याने आरोपी जेरबंद करण्यास मोठे सहाय्य झाले” असल्याचे सांगितले आहे.
या खुनाचा अत्यंत शिताफीने तपास करून उपविभागीय अधिकारी संजय सातव गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके,सोमनाथ दिवटे व वीस पोलिसांच्या माध्यमातून तपास सुरू असताना गुप्त खबरीने दिलेल्या माहिती वरून सदरचा बेंद्र्या उर्फ देबेंद्र दुधकाल्या उर्फ भारत भोसले (वय-२८) रा.पढेगाव ता.कोपरगाव यास ताब्यात घेत चौकशी केली असता सदरचा दुहेरी खून त्याचे साथीदार दिलीप भोसले (वय-१९ ) रा.वेस ता.कोपरगाव आवेल विकास भोसले रा.वेस ता.कोपरगाव यांना ताब्यात घेतले असून मायकल चव्हाण डोंगऱ्या चव्हाण रा.लक्ष्मीनगर कोपरगाव हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू असून चोरीच्या उद्देशाने हा खून पाच जणांनी केल्याची कबुली त्यांनी दिली असून यातील भारत भोसले याच्यावर पारनेर बेलवंडी कोपरगाव पोलीस ठाण्यात जबरी गुन्हे दाखल आहेत.या तिघांना अटक करण्यात आली असून अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांचे वेगवेगळे पथक दोन दिवसापासून प्रयत्न करीत होते या दोन खुनाच्या घटने मुळे राहाता तालुक्यात मोठी घबराट पसरली होती.मयत चांगले यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आम्हाला न्याय द्या अशी मागणी पोलीस अधीक्षकांनी केली होती.पोलीस प्रशासनाने अवघ्या तीन दिवसात गुन्हा उघडकीस आणून सर्व सामान्यांचे लोकांचे विश्वास वाढेल अश्या पद्धतीने लक्षवेधी कारवाई केली आहे.ज्या पद्धतीने ह्या वयोवृद्ध दोघांचा खून करण्यात आला त्या वरून हे खून सराईत गुन्हेगारांनी केले असल्याचा अंदाज होता ते तंतोतंत खरा ठरला आहे.या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव,गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके व राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये आदींनी उघडकीस आणला आहे
..त्या गुन्हेगारांचा आणि जवळके गावाचा संबंध नाही-उपसरपंच विजय थोरात
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत जवळके येथील उपसरपंच विजय थोरात यांचेशी चर्चा केली असता त्यांनी असे कोणतेही गुन्हेगार जवळके ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी नसून जवळके पासून नजीक असलेल्या वेस ग्रामपंचायत ता.कोपरगाव हद्दीत असल्याचे सांगून पोलिसांकडून चुकून गावाचे नाव बदलले गेले असावे असे म्हटले आहे.