जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चोर समजून मारहाण,परप्रांतीयाचा मृत्यू,कोपरगावात चार आरोपींना पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर शिवारात असलेल्या २८ चारी रोड येथे पश्चिम बंगाल येथील वासुदेव तुफान मार्डी (वय-४०) यास चोर समजुन त्याच गावातील आरोपी मच्छीन्द्र श्रावण संवत्सरकर,अमोल विठ्ल संवत्सरकर,बापू गोरख संवत्सरकर व सुरेश पांडुरंग दादरे यांनी काठी व पावड्याने मारहाण करून गंभीर जखमी करुण मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून यातील दोन आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना कोपरगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.त्यामुळे शिंगणापूर शिवारात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात काही दिवसापूर्वी एक अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला होता.यात पश्चिम बंगाल राज्यातील दक्षिण दिनाजपुर जिल्ह्यातील बालोरीया येथील मजूर वासुदेव मार्डी (वय-४०) याचे निधन झाले होते.या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंदणी दप्तरात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची (क्रं.२१/२०२१) प्रमाणे नोंद केली होती.मात्र त्याचा तपास करताना त्यांना धक्कादायक माहिती हाती आली होती.त्यात मिळालेल्या माहितीनुसार मयत हा दि.०३ जून रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास २८ चारी परिसरात संशयास्पदरित्या फिरत असताना आरोपीनी त्यास चोर समजून त्यांच्या हातातील काठ्या व फावड्याने त्यास मारहाण करून गंभीर दुखापत केली होती.त्या नंतर त्यास काही नागरिकांनी कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचार्थ दाखल केले होते.मात्र उपचारा दरम्यान या इसमाचे दि.०४ जून रोजी निधन झाले होते.याबाबत पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत धक्कादायक माहिती मिळाली होती.त्यानुसार कोपरगाव शहर पोलिसांनी तपास केला असता त्यांना वरील आरोपी या गुन्ह्यात सामील असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिसानी फिर्यादी अर्जुन दारकुंडे यांनी फिर्याद दाखल करून यातील आरोपी मच्छीन्द्र श्रावण संवत्सरकर,अमोल विठ्ल संवत्सरकर,बापू गोरख संवत्सरकर व सुरेश पांडुरंग दादरे यांनी काठी व पावड्याने मारहाण केले बाबत गुन्हा दाखल केला होता.या तपासात जखमीस मराठी भाषा येत नसल्याने तपासात मोठा अडथळा निर्माण झाला होता.भाषेचा जाणकार उपलब्ध झाले नंतर पोलिसांनी पुढील तपास केला आहे.त्यामुळे या प्रकरणी पोलिसानी चौकशी करून यातील दोन आरोपींना गजाआड करून कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री डोईफोडे यांचे समोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपींचा वतीने अड्.एम.पी.येवले यांनी काम पाहिले आहे.या घटनेमुळे शिंगणापूर शिवारात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close