जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात अवैध गोवंश जनावरांसह २.५० लाखांचा ऐवज जप्त,दोन आरोपींवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास संजयनगर येथील हाजी मंगल कार्यालयाजवळ अवैध रित्या गोवंश जनावरे कत्तलीसाठी आपल्या ताब्यातील वाहनात घालून नेट असताना आरोपी शिवराज भाऊसाहेब आजगे (वय-२२) रा.शिंगणापूर व दुसरा आरोपी अरबाज मजीद कुरेशी (वय-१९) रा.संजयनगर या दोघांनी आपल्या ताब्यातील टाटा कंपनीच्या निळ्या वाहनातून चार मोठ्या जर्शी गाया व चार लहान गोऱ्हे आदी २.५० हजारांचा ऐवज घेऊन जाताना कोपरगाव शहर पोलिसानी अटक केली आहे.व त्यांच्यावर फिर्यादी पो.कॉ.सुरजकुमार जीवन अग्रवाल (वय-३०) यांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

सन-२०१४ मध्ये पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार आले आणि केंद्राकडे पडून असलेल्या कायद्याचा पाठपुरावा सुरू झाला.अखेर तब्बल १९ वर्षांनी राष्ट्रपतींनी त्या कायद्यावर मान्यतेची मोहोर उमटवली.१९७६ च्या व आता अस्तित्वात आलेल्या कायद्यामध्ये काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत.आधीच्या कायद्यात गाईच्या हत्येला प्रतिबंध करण्यात आला होता.या कायद्यात गाईबरोबर बैलाचा व वळूचा समावेश करण्यात आला.म्हणजे गोवंश हत्याबंदी करण्यात आली. मात्र हा कायद्याचे उल्लंघन वारंवार होताना दिसत आहे.

१९९५ मध्ये युती सरकारने विधिमंडळात प्राणिरक्षण सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले.१९९६ मध्ये ते राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले.पुढे राज्यात सत्ताबदल झाला,केंद्रातही राजकीय परिवर्तन झाले आणि हा कायदा काहीसा विस्मृतीच्या पडद्याआड गेला.परंतु २०१४ मध्ये पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार आले आणि केंद्राकडे पडून असलेल्या कायद्याचा पाठपुरावा सुरू झाला.अखेर तब्बल १९ वर्षांनी राष्ट्रपतींनी त्या कायद्यावर मान्यतेची मोहोर उमटवली.१९७६ च्या व आता अस्तित्वात आलेल्या कायद्यामध्ये काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत.आधीच्या कायद्यात गाईच्या हत्येला प्रतिबंध करण्यात आला होता.या कायद्यात गाईबरोबर बैलाचा व वळूचा समावेश करण्यात आला.म्हणजे गोवंश हत्याबंदी करण्यात आली.हा कायदा एवढय़ावरच थांबत नाही,तर आणखी काही कडक व कठोर र्निबध लादले आहेत.गाय,बैल,वळू यांची कत्तल करता येणार नाही,त्या हेतूने त्यांची खरेदी,विक्री करता येणार नाही,विल्हेवाट लावता येणार नाही.गाय,बैल,वळू यांचे मांस स्वत:च्या ताब्यात ठेवता येणार नाही.बाहेरील राज्यात कत्तल केलेली गाय,बैल,वळू यांचे मांस स्वत:च्या ताब्यात ठेवता येणार नाही.म्हणजेच एक प्रकारे गाय,बैल,वळू यांचे मांस सेवन करण्यासच प्रतिबंध करण्यात आला आहे.यापैकी कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र ठरविण्यात आला असतानाही राज्यात सर्रास या प्राण्यांची कत्तल सुरु आहे.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही.

कोपरगावात गत दोन वर्षांपूर्वी ऐन शिवरात्रीच्या दिवशी नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मोठी धाड टाकून संजयनगर येथील मोठे गोवंश हत्तेचे रॅकेट उघड केले होते.त्या नंतरही त्याचे वारंवार उल्लंघन होताना दिसत आहे.स्वतंत्र कत्तलखाना उभारूनही त्याचा उपयोग केला जात नाही,स्वतः नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या बाबी उघड करूनही त्याला पोलिसांना थांबवता आले नाही.कालही अशीच घटना उघड झाली असून त्यात मोठे घबाड सापडले आहे.गुप्त खबऱ्या मार्फत पोलिसांना खबर मिळाल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता त्या ठिकाणी हे सावज अलगत त्यांचा ताब्यात मिळाले आहे.त्यात चार मोठ्या जर्शी गायी व पाच लहान गोऱ्हे असा ०२ लाख ५० हजारांचा अवैज मिळाला आहे.त्यात जप्त केलेल्या मालमत्तेत एक ०१ लाख ९० हजार रुपये किमतीचा निळ्या रंगाचा टाटा कंपनीचा एस मालवहातुक चार चाकी वाहन (क्रं.एम.एच.२० सी.टी.६८८३)आदींचा समावेश आहे.शहर पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

या प्रकरणी आरोपी शिवराज आजगे व अरबाज कुरेशी या दोघांवर कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गु.क्रं.१३२/२०२१ भारताच्या प्राण्यास निर्दयपणे वागविण्याचा कायदा अधिनियम १९६० चे कलम ११(१)(ह)व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम कलम १९९५ चे कलम ५ (ब),९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलसी निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close