जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात आंचलगाव येथील शेतकऱ्याचा खून झाल्याची चर्चा !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील सुभाषनगर या उपनगरात एका ओळखीच्या महिलेकडे गेलेल्या आंचलगाव येथील शिंदे नामक कांदा उत्पादक शेतकऱ्याला हृदय विकाराचा झटका आल्याने त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचे निधन झाले तथापि कोपरगाव शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते व सदर शेतकऱ्याचा खून झाल्याची चर्चा शहरात पसरली होती तथापि कोपरगाव शहर पोलिसांनी या बाबत ती अफवा असल्याचे सांगून त्याचे निवारण केले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुक्यात आंचलगाव ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी सध्या कांद्याला चांगला भाव असल्याने आपले कांदे विक्रीसाठी घेऊन बाजार समितीत आला होता.सदर शेतकऱ्याने कांद्याची पट्टी घेतल्या नंतर तो आपल्या ओळखीच्या महिलेकडे काही अज्ञात कामासाठी गेला असताना त्या ठिकाणी सदर इसमास हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने सदर घटनेने त्या भागातील महिला घाबरून गेली होती तथापि तिने सावध होत सदर इसमास काही नागरिकांच्या मदतीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते.दरम्यान तो पर्यंत सदर शेतकरी हा बोलत होता त्यांनी ओळखीच्या सोबतच्या नागरिकांच्या मदतीने आपल्या मुलास भ्रमणध्वनीच्या सहाय्याने संपर्क साधून त्यास बोलावून घेऊन परिस्थितीचे गांभीर्य सांगितले तो पर्यंत सदर महिलेले ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते.दरम्यान संबंधित शेतकऱ्याचा मुलगा आला व त्यांनी या बाबत खातरजमा करण्यासाठी एस.जी.शाळेनजीकच्या खाजगी रुग्णालयात भरती करून सदरच्या आजाराची खातरजमा करून घेतली. दरम्यानच्या काळात सदर शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता तो पर्यंत शहरात सदरच्या शेतकऱ्याचा या भागात खुनच झाल्याची अफवा पसरली होती.या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप बोरसे यांच्याशी समक्ष संपर्क साधला असता त्यांनी वरील घटनेचा खुलासा केला आहे.त्यामुळे सदरची घटना अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close