जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील..या उपनगरातील नागरिकांना जागेचे उतारे द्या-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या लक्ष्मीनगरात वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांना तातडीने त्यांच्या नावचे उतारे देण्यासाठी तातडीने पावले उचला अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोपरगाव शहरातील लक्ष्मी नगरमध्ये शासकीय जागेवर वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांच्या घरांची आ.काळे व नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली दौरा केला होता.त्यावेळी हे आदेश दिले आहेत.नगरपरिषद निवडणुका जवळ आल्यावर अशा बातम्या आवर्जून येत असतात व दौरेही वेगाने होत असतात.त्यामुळे हा खरंच दौरा होता की निवडणूक गमजा आहे हे लवकरच समजणार आहे.

सदर प्रसंगी मुख्याधिकारी शांताराम गोसावी,नगररचना विभागाचे अधिकारी संजय बारगळ,नगरपरिषद अभियंता हर्षवर्धन सुराळकर,निलेश मिरीकर,विशाल वऱ्हे,दिपक बडगुजर,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,माधवी वाकचौरे,राजेंद्र वाकचौरे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,शरद खरात, गोरख कडू,इस्माईल पठाण,राजन त्रिभुवन,डॉ.तुषार गलांडे,चंद्रशेखर म्हस्के,जावेद शेख,मनोज कडू,विकास बेंद्रे,नारायण लांडगे आदीसह प्रभागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी आ.काळे म्हणाले की,”कोपरगाव शहरात शासकीय जागेवर अनेक नागरिक वर्षानुवर्षापासून राहत आहे.शहराच्या लक्ष्मीनगर परिसरातही बऱ्याच नागरिकांचे शासकीय जागेवर वास्तव्य आहे.या नागरिकांनी शासकीय जागेवर बांधलेली अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी नगररचना,मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक सुधाकर नांगनोरे यांची भेट घेवून त्यांना या जागा नियमानुकूल करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कमिटीची बैठक घेऊन लक्ष्मीनगर मधील शासकीय जागेवर राहणाऱ्या नागरीकांना त्यांच्या जागा शासकीय नियमाप्रमाणे नियमित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून हे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत.कोपरगाव नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्व्हे करून अतिक्रमित जागेची माहिती घेवून हे प्रस्ताव शासनाकडे दाखल केले असल्याची माहिती दिली आहे.

शासन निर्णयानुसार रस्ता,खुली जागा व सुविधा भूखंडासाठी लागणाऱ्या जागेसाठी प्रस्तावित आराखड्यानुसार विकास नियंत्रण नियमावली मधील अटी शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे मार्फत कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाची दखल घेवून या प्रस्तावास मंजुरी मिळावी व लक्ष्मीनगर भागात शासकीय जागेवर राहत असलेल्या नागरिकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देखील भेटलो आहे.लवकरच या प्रस्तावास मंजुरी मिळणार आहे.सर्व अधिकाऱ्यांनी किरकोळ त्रुटी शिथिल करून लवकरात लवकर शासन दरबारी सादर कराव्या व नगर रचना विभागाने महसूल विभागाला पुढील कार्यवाहीसाठी सूचना द्याव्यात व लवकरात लवकर या नागरिकांना त्यांच्या नावचे उतारे देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशा सूचना त्यांनी शेवटी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close