गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात रस्त्याच्या कारणावरून हाणामारी,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील आपेगाव रोड लगत असलेल्या उककडगाव ग्रामपंचायत हद्दीतील जमिनीत,”आपल्याला दिलेल्या रस्त्याने तुम्ही जायचे नाही” अशी हरकत घेऊन आपल्याला आरोपी भाया संतोष मच्छीन्द्र निकम याने दगडाने मारहाण केल्याची फिर्याद उषा रामेश्वर निकम यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिल्याने खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिला हि आपल्या शेतात जात असताना त्याला आरोपी इसम संतोष निकम याने हरकत घेतली.त्याला फिर्यादी महिलेने त्याला,”आपल्याला हिस्याचा रस्ता आहे”.याची जाणीव करून दिली असता,”आरोपी संतोष निकम याने,” सदरचा रस्ता हा आपलाच आहे,तुम्ही त्या रस्त्यावरून जायचे नाही” असे म्हणून हरकत घेतली.व हातात दगड घेऊन महिलेला मारला असून फिर्यादी महिलेला बोचकडले असून भायास चावा घेतला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,उक्कडगाव येथील फिर्यादी महिला उषा निकम व आरोपी संतोष निकम यांची भाव हिस्याची जमीन शेजारी-शेजारीच आहे.फिर्यादी माहिलेला जाण्यासाठी आरोपीच्या शेतातून रस्ता आहे.दि.२७ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला हि आपल्या शेतात जात असताना त्याला आरोपी इसम संतोष निकम याने हरकत घेतली.त्याला फिर्यादी महिलेने त्याला,”आपल्याला हिस्याचा रस्ता आहे”.याची जाणीव करून दिली असता,”आरोपी संतोष निकम याने,” सदरचा रस्ता हा आपलाच आहे,तुम्ही त्या रस्त्यावरून जायचे नाही” असे म्हणून हरकत घेतली.व हातात दगड घेऊन महिलेला मारला असून फिर्यादी महिलेला बोचकडले या शिवाय फिर्यादीचा भाया आप्पासाहेब नवनाथ निकम याचेही उजव्या हाताच्या मधल्या बोटास चावा घेतला आहे.अशी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१२९/२०२१ भा..दि.कलम ३२४,३३७,५०४,५०६,प्रमाणे आरोपी संपोष निकम याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.श्री वाखुरे हे करीत आहेत.