गुन्हे विषयक
जामीनदारास फोन केल्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
या पूर्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्हयातील जामीनदारास,”तू फोन का केला” या कारणावरून आरोपी अरविंद लक्ष्मण लोणारी,मयूर अरविंद लोणारी,लक्ष्मण शंकर लोणारी,कविता अरविंद लोणारी,कोमल अरविंद लोणारी रा.ब्राह्मणगाव तालुका कोपरगाव यांनी आपल्याला व साक्षिदार पत्नी पद्मावती हिला दगडाने,रॉड,व दांड्याने डोक्यात,पाठीत,पायावर मारून चावा घेऊन लाथाबुक्यांनी मारहाण केली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नुकतीच अशोक शंकर लोणारी (वय-६५) यांनी दाखल केल्याने ब्राम्हणगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव हद्दीत आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली असून त्यात आरोपीनी मागील एका गुंह्यातील जामिनदारास,”फोन का केला” या किरकोळ कारणावरून आरोपी अरविंद लक्ष्मण लोणारी,मयूर अरविंद लोणारी,लक्ष्मण शंकर लोणारी,कविता अरविंद लोणारी,कोमल अरविंद लोणारी आपल्याच भावास फिर्यादी अशोक लोणारी व त्यांची पत्नी पद्मावती लोणारी यांना गैर कायद्याची मंडळी जमवून त्यांना दगड,रॉड,आदींच्या साह्याने मारहाण केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,सध्या कोरोना साथीचे राज्यात थैमान सुरु आहे.अनेकांचे त्यात बळी जात आहे.तर लाखो नागरिकांना त्याची लागण होऊन त्यात त्यांचा प्रचंड पैसा खर्च होत आहे.त्यामुळे प्रशासन व नागरिकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.त्याचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे.त्यामुळे सर्वांचे लक्ष या कोरोना साथीला नियंत्रणात कसे आणायचे याकडे लागले असताना काही नागरिकांना या संकटाची काहीच चाहूल लागलेली दिसत नाही. व त्यांचे नेहमीचे कज्जे,तंटे आजही बिनधोक सुरु असल्याचे दिसत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव हद्दीत आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली असून त्यात आरोपीनी मागील एका गुंह्यातील जामिनदारास,”फोन का केला” या किरकोळ कारणावरून आरोपी अरविंद लक्ष्मण लोणारी,मयूर अरविंद लोणारी,लक्ष्मण शंकर लोणारी,कविता अरविंद लोणारी,कोमल अरविंद लोणारी आपल्याच भावास फिर्यादी अशोक लोणारी व त्यांची पत्नी पद्मावती लोणारी यांना गैर कायद्याची मंडळी जमवून त्यांना दगड,रॉड,आदींच्या साह्याने डोक्यात,पाठीत,पायावर मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन जखमी करुन गेले आहे.व त्यांचा भ्रमणध्वनी घेऊन गेले आहे.या प्रकरणी फिर्यादी अशोक लोणारी यांनी या प्रकरणी पोलिसांत आपल्या ब हवाविरुद्ध व अन्य नातेवाईकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१२३/२०२१ भा.द.वि कलम ३२४,३२७,१४१,१४१,१४७,१४८,१४९,३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आंधळे हे करीत आहेत.