जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यातही सामुदायिक प्राणवायू प्रकल्पाची गरज-नगराध्यक्ष

न्यूजसेवा

कोपरगांव-( प्रतिनिधी)-

पुण्यातील उद्योजक,हॉस्पिटल्स,दानशूर व्यक्ती,संस्था यांनी एकत्र येऊन पुणे शहरासाठी १४ ऑक्सिजन प्रकल्प खरेदी करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला असून त्याचे अनुकरण कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी करणे गरजेचे असल्याचे प्रदीपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच केले आहे.

भारताची कोरोनाची आकडेवारी जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.महाराष्ट्रातही रोज साठ हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत असून अनेकांना प्राण वायू मिळणे अवघड बनले आहे.अनेक रुग्णांचा प्राण वायू अभावी मृत्यू होत आहे.कोपरगावतही प्राण वायूची कमतरता आहे.व मोठ्या प्रमाणात कोरोना मृत्युदर वाढला आहे या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे.यामध्ये आता दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची भर पडतेय.गेल्या चार दिवसात देशात १३ लाख नव्या रुग्णांची भर पडली असून शनिवारी जवळपास साडेतीन लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. तसेच शनिवारी एकाच दिवशी २ हजार ७६७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.ही आकडेवारी जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.महाराष्ट्रातही रोज साठ हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत असून अनेकांना प्राण वायू मिळणे अवघड बनले आहे.अनेक रुग्णांचा प्राण वायू अभावी मृत्यू होत आहे.कोपरगावतही प्राण वायूची कमतरता आहे.व मोठ्या प्रमाणात कोरोना मृत्युदर वाढला आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यानी त्यात म्हटलें आहे की,”कोपरगावातील नागरिकांसाठी आपण सोयीसाठी असा एक ऑक्सिजनचा प्लांट उभारू शकतो का? याचा विचार करायला हरकत नाही.कारण येथून पुढच्या काळात कोरोना व असेच जीवघेणे आजार बळावले तर ऑक्सिजनची कायमच गरज भासेल असे वाटते.असा प्रकल्प उभारल्याने कोपरगाव व आसपासच्या तालुक्यातील गरजूंना उपयोग होऊ शकतो.कायमस्वरूपी सोय होईल.शहर व तालुक्यातील उद्योजक,मोठी रुग्णालये सहकारी संस्था,पतसंस्था,दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन सर्वांच्याच सोयीसाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारावा नंतर औद्योगिक वापरासाठीही तो उपयोगी पडू शकतो.आ.आशुतोष काळे,बिपिन कोल्हे,राजेश परजणे,कैलास ठोळे,अनेक नामवंत उद्योजक,ओमप्रकाश कोयटे,बँका-पतसंस्था,मोठे हॉस्पिटल्स,ज्ञात अज्ञात दानशूर व्यक्तीनी एकत्र येऊन निर्णय घेतला तर कोपरगावसाठी ऑक्सिजन प्रकल्प उभा करणे अवघड नाही असे वाटते.नागरीकही आपापल्या परीने हातभार लावतीलच यात शंका नाही.प्रत्येक बाबतीत शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण एकजुटीने उभे राहिलो तर सर्वांनाच उपयुक्त असे काम उभे राहिल असा विश्वासही नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close