जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पस्तीस लाखांची चांदी कोपरगाव नजीक जप्त,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना कालखंडात कोपरगाव शहर पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना साईबाबा नाका येथे एक संशयित मारुती सियाज कार चालक हा आपल्या कारची काच उघडी ठेऊन व मुखपट्टी न लावताच प्रवास करताना आढळून आल्याने त्याची कार कारवाईसाठी (क्रं.एम.एच.१८ ए. जे.९०२०) अडवली असता तिची झडती घेतली असता त्या कारमध्ये मागील शिटच्या चोरकप्प्यात सुमारे साठ किलो बेहिशेबी चांदी मिळून आल्याने पोलिसानी आरोपी सौरभ अनिल पाटील (वय-२६) रा.राजगुरूनगर हुपरी जिल्हा कोल्हापूर याच्या विरुद्ध कारवाई केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कर्तव्यावर असलेले कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांचे सहकारी यांनी त्यास अडवले व त्याच्या गाडीत काय आहे याची विचारणा केली असताना त्याने,”आपण हार्डवेअरचे व्यापारी असून आपल्या गाडीत काहीही नाही” अशी बतावणी केली मात्र त्याची देहबोली वेगळेच काही सांगत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्या गाडीतील पाठीमागील शीटला एक संशयास्पद चैन बसवलेली आढळून आली यात हे घबाड सापडले आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे.आज पुन्हा एकदा राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज ६८ हजार ६३१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज ४५ हजार ६५४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३१ लाख ६ हजार ८२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण ६ लाख ७० हजार ३८८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८०.९२ टक्के झाले आहे.राज्यात आज मृतांचा आकडाही ५००च्या वर गेला आहे.कोपरगाव तालुक्यातही गत सोळा दिवसात जवळपास २८ जण व आजपर्यंत ७६ नागरिकांचे बळी गेले आहे.तर दररोज कोरोना बाधितांचे नवे-नवे उच्चान्क निर्माण होत आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध घातले आहे व त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.त्यानुसार पोलीस आपली भूमिका निभावत असून कोपरगाव शहर पोलिसही त्याला अपवाद नाही.

कोपरगाव शहर पोलीस दि.१७ एप्रिल रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास साईबाबा कॉर्नर येथे आपले नगर-मनमाड या राज्यमार्गावर कर्तव्य बजावत असताना त्यांना एक मारुती सियाज हि कार संशयित रित्या जाताना दिसून आली तिचा दरवाजा उघडा असतानाही चालकाने आपल्या तोंडाला मुखपट्टी बांधलेली नव्हती.म्हणून कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांचे सहकारी यांनी त्यास अडवले व त्याच्या गाडीत काय आहे याची विचारणा केली असताना त्याने,”आपण हार्डवेअरचे व्यापारी असून आपल्या गाडीत काहीही नाही” अशी बतावणी केली मात्र त्याची देहबोली वेगळेच काही सांगत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्या गाडीतील पाठीमागील शीटला एक संशयास्पद चैन बसवलेली आढळून आली व त्याचा काही भाग फुगलेला दिसत होता.म्हणून पोलीस कर्मचारी यांनी ती उघडून पहिली असता त्यात पांढऱ्या गोणीत साठ किलोचे चांदीचे घबाड सापडले आहे.त्याबाबत त्याकडे पावती,बिल याबाबत चौकशी करता त्याने काहीही देण्यास असमर्थता दर्शवली आहे.त्याबाबत पोलिसांनी रीतसर पंचनामा करून संशयित आरोपी सौरभ अनिल पाटील (वय-२६) रा.राजगुरूनगर हुपरी जिल्हा कोल्हापूर याच्या विरुद्ध गु.र.क्रं.१२०/२०२१ महाराष्ट्र पोलसी कायदा १२४ सह भा.द.वि.कलम १८८(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.व या गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची कार व ३० लाख रुपये किमतीची चांदी असा ३५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.या कारवाई बाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पवार हे करीत आहेत.

या कारवाईत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना पोलीस नाईक खारतोडे,नवाळी,होमगार्ड अमोल थोरात,विशाल कोळपे,चालक सहाय्यक फौजदार साठे यांनी सहकार्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close