जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात ‘रेमडेसीवीर’औषधांचे मोठे रॅकेट कार्यरत !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यात कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर वाढली असून या साथीचा ताप कमी करण्यासाठी उपयोगात आणले जाणारे औषध म्हणून “रेमडेसीविर” औषधांची ओळख असून सध्या याला प्रचंड मागणी वाढली असून सरकारने हा तुटवडा कमी करण्यासाठी निर्यात बंदी केली असली तरी अद्याप याचा पुरवठा सुरळीत झाला नसून कोपरगावात सध्या मोठी टंचाई निर्माण झाली असून त्याचा फायदा औषधालये उपटत असून रुग्णांच्या नातेवाईकांकडून हजारो रुपये उकळत असल्याची घटना नुकतीच उघड झाली असून यात काही बदलून गेलेले पोलीस अधिकारी,नाशिक येथील एक पत्रकार,पत्रकारांचे नातेवाईक,औषधालये यांचे संचालक सामील असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे त्यामुळे कोपरगावात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांची संख्येतही मोठी वाढ झाली आहे.त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.कोपरगाव शहरही त्याला अपवाद नाही.कोपरगावातील अनेक औषधालये याचा काळा बाजार करून मोठी माया जमा करत असून माणुसकीला काळिमा फासत असताना दिसत आहे.

देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा विक्रमी वाढ देशात काही दिवसांपूर्वी नियंत्रणात आलेला कोरोना संसर्ग आता नियंत्रणाबाहेर जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.नव्यानं कोरोना रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात दिवसागणिक अधिकाधिक भर पडत असल्यामुळं आता प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढे मोठी आव्हानं उभी राहत आहेत.केंद्रीय आरोग्य विभागानं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासांत देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे.जवळपास दीड लाखांहून अधिक रुग्णसंख्येची नोंद झाल्यामुळं आता कोरोनाची धास्ती आणखी वाढली आहे.कोपरगावात प्रतिदिन हा आकडा दीडशे-दोनशेच्या आसपास रेंगाळताना दिसत आहे.विशेष म्हणजे गत पंधरा दिवसात सव्वीस रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे हे धक्कादायक आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांची संख्येतही मोठी वाढ झाली आहे.त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.कोपरगाव शहरही त्याला अपवाद नाही.कोपरगावातील अनेक औषधालये याचा काळा बाजार करून मोठी माया जमा करत असून माणुसकीला काळिमा फासत असताना दिसत आहे.त्याला काही उपाययोजना करणार आहे की नाही असा सवाल रुग्णांच्या नातेवाईकांनी व आमच्या प्रतिनिधीने चार दिवसापूर्वी विचारला होता त्या नंतर हि घटना उघड झाली आहे हे विशेष !

या रॅकेट मध्ये एका नागरिकास आपल्या नातेवाईक रुग्णांस हे इंजेक्शन न मिळाल्याने त्याने जिल्हास्तरावरील एका पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्याला व औषधालय संचालकास हा रस्ता सापडला आहे.त्यात एक नाशिक येथील पत्रकार व स्थानिक सेवानिवृत्त पत्रकाराचे नातेवाईक जे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत ते यात सामील असल्याचे समजते आहे.बदलून गेलेले पोलीस अधिकारी व औषधालये यांचा थेट संबंध असून यात कोणाचा किती संबंध आहे व कोण कशासाठी हे उद्योग करत आहे हे लवकरच समजणार आहे.जिल्ह्याच्या ठिकाणाहुन थेट कोपरगावात हे ४८ इंजेक्शनचे कनेक्शन असून या ठिकाणी संभाजी महाराज चौकातील एक औषधालयाचा संचालक यात सामील असून हे इंजेक्शन थेट वीस हजार रुपयाला विकले जात आहे.या कडे जवळपास रोज ४८ इंजेक्शन येत असल्याची विश्वसनीय खबर आहे.मात्र नातेवाईक आपल्याला अडचण नको म्हणून या औषधालयाचे व त्याच्या नातेवाईकांचे नाव घेत नाही.या बाबत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी असा आरोप नुकताच केला आहे.त्यामुळे याबाबत नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे नुकतीच पालकमंत्री,जिल्हाधिकारी यांची कोविड बाबत आढावा बैठक संपन्न झाली असताना हि गंभीर बाब उघड झाली आहे.या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या प्रवृत्तीवर तालुका प्रशासनाने कारवाई करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close