गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात एकाचे अकस्मात निधन

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी सुनील दगुराव पानगव्हाणे (वय-३२) यांचे काल सायंकाळी ७.०९ वाजेच्या सुमारास आठवडे बाजाराचे दिवशी कोळपेवाडी येथे अकस्मात निधन झाले आहे.त्यांना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता वैदयकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणी नंतर मृत घोषित केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत इसम सुनील पानगव्हाणे हे काल रविवार असल्याने कोळपेवाडी आठवडे बाजाराचे निमित्ताने बाजार करणेसाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणी बाजारातच हृदय विकाराचा झटका आला त्यातच ते बेशुद्ध झाले.असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान नजीकच्या ग्रामस्थांनी त्यांना उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंदणी क्रं.९/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.श्री भताने हे करीत आहेत.
या घटनेने माहेगाव देशमुख परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.