आरोग्य
कोपरगावात कोरोनाने घेतले पुन्हा दोघांचे बळी,तालुक्यात खळबळ
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या ३ हजार ११५ तर सक्रिय रुग्ण संख्या ८७,तर एकूण मृत्यू संख्या ४७ झाली आहे.तर मृत्यू दर १.४५ टक्के असून एकूण श्राव तपासणी संख्या २१ हजार ६८८ झाली आहे.त्याची दर दस लाखाला ८६ हजार ५९२ झाली असून त्याचा बाधित दर ११४.३२ टक्के आहे.तर आतापर्यंत रुग्ण बरे होण्याची संख्या ०२ हजार ९८३ इतकी आहे.
राज्यात गेल्या २४ तासात दहा हजार १८७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २२ लाख ०८ हजार ५८६ वर पोहोचली आहे.तर कोरोनामुळे आतापर्यंत ५२ हजार ४४० जणांचा मृत्यू झाला आहे.राज्यातील सध्याचा मृत्यूदर २.३७ टक्के आहे.
कोपरगाव तालुक्यात आज बाधित आलेल्या रुग्णांत काले मळा एक पुरुष वय-३९,दोन महिला वय-३३,३७,शिवाजी रोड एक पुरुष वय-४४,टाकळी एक पुरुष वय-४८,संभाजी चौक एक महिला वय-६०,जेऊर पाटोदा एक महिला वय-३०,एक पुरुष वय-१३ आदींचा समावेश आहे.तर नगर येथील प्रयोग शाळेत २७ नागरिकांचे श्राव पाठवले आहे.तर नगर येथून आलेल्या अहवालात ०८ जण बाधित आढळले आहे.त्यात धोत्रे रास्ता तळेगाव मळे साकरवाडी पुरुष वय-४८,त्याच ठिकाणची महिला वय-१६,आणखी एक महिला वय-७३,स्वामी रेसोर्ट जेउरकर वस्ती पानमळा साई सिद्धी नगर,एक महिला वय-४३,स्वामी टॉवर्स सप्तर्षी मळा साईसिद्धी नगर पुरुष वय-४४,कोपरगाव दोन पुरुष वय-५८,२४,वारी पुरुष वय-५२ आदींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या ३ हजार ११५ तर सक्रिय रुग्ण संख्या ८७,तर एकूण मृत्यू संख्या ४७ झाली आहे.तर मृत्यू दर १.४५ टक्के असून एकूण श्राव तपासणी संख्या २१ हजार ६८८ झाली आहे.त्याची दर दस लाखाला ८६ हजार ५९२ झाली असून त्याचा बाधित दर ११४.३२ टक्के आहे.तर आतापर्यंत रुग्ण बरे होण्याची संख्या ०२ हजार ९८३ इतकी आहे तर बरे होण्याची टक्केवारी ९६.२६ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णलयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९२ हजार ८९७ आहे.त्यात सर्वाधिक १९ हजार ६१५ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.त्यानंतर नागपूर जिल्ह्यात हा आकडा ११ हजार ४८० इतका झाला आहे.ठाणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी १० हजारांच्या पुढे आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर मुंबई महापालिका हद्दीत ही रुग्णसंख्या ०८ हजार ९८४ इतकी झाली आहे.सरकार आणि स्थानिक प्रशासन सातत्याने राज्यातील जनतेला कोरोनाच्या नियमांचं सक्तीने पालन करण्याचं आवाहन करत आहे.तरीही नागरिक या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करताना दिसत आहेत.नागरिकांनीं आता पुन्हा एकदा शिस्त लावण्याची व स्वतःच स्वतःचे रक्षण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी व्यक्त केले आहे.