जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

२६.४९ लाखांच्या भिंगरीवर डल्ला,कोपरगावात चौघांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या झगडे फाट्यानजीक आरोपी योगेश कैलास खरात राहणार भोजडे चौकी,सदरसंतोष गौतम खरात राहणार भोजडे चौकी,धनंजय प्रकाश काळे राहणार रामवाडी सवंत्सर एक अनोळखी इसम अशा चौघांनी विविध आकारातील २६ लाख ४९ हजार ७४१ रुपये किमतीचे बाटल्यांचे बॉक्स यांचेवर डल्ला मारल्याचा गुन्हा संवत्सर येथील फिर्यादी शरद गोपीनाथ वरगुडे (वय-४०) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

सदर ट्रक हा आरोपी यांनीं खरेदी केला असतां व खरेदीदार हे गावानजीकचे असल्याने विश्वासाने हा माल भरण्यास ट्रान्सपोर्ट मालकाने व मालाचे खरेदीदार यांनी परवानगी दिली होती.जुन्या मालकाने आपल्या ट्रकमध्ये माल भरून या मालाचे खरेदीदार व ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक यांचा विश्वास संपादन करून नांदेड येथे सोडण्यास जात असताना चालकास शस्राचा धाक दाखवून हि लूट केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”ट्रक (क्रं.एम.एच.४१,६३९१) हा आरोपी यांनीं खरेदी केला असतां व खरेदीदार हे गावानजीकचे असल्याने विश्वासाने हा माल भरण्यास ट्रान्सपोर्ट मालकाने व मालाचे खरेदीदार यांनी परवानगी दिली होती. जुन्या मालकाने आपल्या ट्रकमध्ये कोळपेवाडी येथील कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्यातून हा माल भरून या मालाचे खरेदीदार व ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक यांचा विश्वास संपादन करून नांदेड येथे सोडण्यास जात असताना दि.२५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान चांदेकसारे हद्दीतील झगडे फाट्यानजीक चालकास आरोपी योगेश कैलास खरात राहणार भोजडे चौकी,सदर संतोष गौतम खरात राहणार भोजडे चौकी,धनंजय प्रकाश काळे राहणार रामवाडी सवंत्सर एक अनोळखी इसम अशा चौघांनी चालकास शस्राचा धाक दाखवून मारहाण करून सदर ट्रक मधून खाली उतरून देऊन त्या मधील ५१ हजार ५०० रुपये किमतीची भिंगरी संत्रा कंपनीचे ७५० मिली मापाच्या प्रत्येक बॉक्स मध्ये १२ वाटल्या असलेले १०० बॉक्स ज्याचा बॅच नंबर १९९७ असा असलेले, ५ लाख ४१ हजार ५०० रुपये किमतीचे भिंगरी संत्रा कंपनीचे १८० मिली मापाच्या प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटली असलेले ९५० बॉक्स ज्याचा बॅच नंबर दोन हजार असलेले,१ लाख ३५ हजार रुपये किमतीचे भिंगरी संत्रा कंपनीचे ९० मिली मापाच्या प्रत्येक बॉक्स मध्ये १०० बाटल्या असलेले २०० बॉक्स ज्याचा बॅच नंबर २००१ असलेले एकूण रुपये ७ लाख २८ हजार सह व्ही.ए. टॅक्स ८१६९२५ एक्साईज ड्युटी ११०४८१६ असे मिळून २६ लाख ४९ हजार ७४१ रुपये किमतीचे बाटल्यांचे बॉक्स यांचेवर डल्ला मारल्याचा गुन्हा संवत्सर येथील फिर्यादी शरद गोपीनाथ वरगुडे (वय-४०) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

सदर प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.७६/२०२१ भा.द.वि. कलम-३९४,३४ प्रमाणे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close