जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

संजीवनीचे “ते” पोपट जनतेपुढे पडले उघडे-जाधव

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात सध्या नगरपरिषदेच्या मंजूर-नामंजूर कामांबाबत वादविवाद-आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.कोल्हे गटाला बांधील असलेले ६-७ जण मिळून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना घेरून नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत.”संजीवनी”आदेशावरून पोपट बोलतांना दिसतात.कोल्हे गटाकडे आर्थिक दहशत असली तरी नगराध्यक्ष वहाडणे यांच्या सोबत सुज्ञ जनता नक्कीच असल्याचा दावा नरेंद्र मोदी मंचचे कार्यकर्ते वसंत जाधव यांनी केला आहे.

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिल्ली येथे जाऊन ना.नितीन गडकरी यांना सांगून “गायत्री” कंपनीला पाच क्रमांकाच्या साठवण तलावाचे खोदकाम करायला सांगितले,त्याप्रमाणे कामही सुरू झाले.पण तुम्हीच अडथळे आणल्याने काम थांबले.त्यानंतर आ.आशुतोष काळे व आम्ही प्रयत्न केल्याने पुन्हा काम सुरू झाले.ते काम पूर्णत्वास जाईलच फक्त कोल्हे गटाचे मांजर आडवे यायला नको-वसंत जाधव,कार्यकर्ते,मोदी विचार मंच.

कोपरगाव नगरपरिषदेने नुकतीच शहरातील सुमारे एकतीस रस्त्यांची कामे मंजुरीसह जवळपास एकोणतीस विषय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती त्यात भाजप कोल्हे गटाने शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांच्या मंजुरीसाठी आधी स्थायी व नंतर विशेष सर्वसाधारण सभेत कोलदांडा घातल्याने वादंग निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर नुकत्याच संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी भ्रष्ट नगरसेवकांचे नावे घेऊन आरोप करण्याचे आव्हान दिले होते.त्यावर पत्रकार परिषद घेऊन वहाडणे यांनी आपण कोल्हे गटाने मागणी केल्याप्रमाणे या पुढे पत्रकार परिषद घेऊनच भ्रष्ट नगरसेवकांची नावे जाहीर करू असे आव्हान दिले होते.त्या प्रमाणे वहाडणे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या सभागृहात नुकतीच पत्रकार परिषद आयोजन करून माजी नगराध्यक्ष,नगरसेवक यांचेवर प्रतिहल्ला प्रतिहल्ला चढवला होता त्याला कोल्हे गटाने। नुकतेच उत्तर दिल्यावर वहाडणे गटाचे कार्यकर्ते वसंत जाधव यांनी पुन्हा एकदा कोल्हे गटाचे पराग संधान व त्यांच्या सहकाऱ्यांवर प्रतिहल्ला चढवला आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”पराग संधान २०१४ चा हिशोब अजूनही पुर्ण झाला नाही का ? २०१४ गेले आता २०२१ सुरू आहे,पुरावे जाहिर करा.तुमची पात्रता जनतेने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दाखवून दिलेली आहे.वहाडणे तुमच्या सर्वांनाच पुरून उरलेले आहेत.येत्या निवडणुकीत जनता तुम्हालाच रस्त्याने चालणे मुश्किल करील हे लक्षात ठेवा.संधान व कोल्हे यांचे काय आर्थिक “संधान” आहे हे जनतेला माहिती आहे.
४ वर्षे आम्हीच कामे मंजूर केली म्हणून कामे झाली अशी मखलाशी करणाऱ्या कोल्हे भाजपाने प्रभागातील कामे करून घेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता मान्य केली.पण आता शहरातील मोक्याचे रस्ते झाले तर नगरपरिषद निवडणुकीत आपल्याला अडचणीचे होईल असे वाटल्याने नामंजुरीचे किळसवाणे डावपेच सुरू केले आहेत.नगराध्यक्ष वहाडणे यांच्यावर टिका केली,विरोध केला तरच संजीवनी कृपेने टेंडर मिळतात,गाड्या भाडोत्री लावता येतात,अतिक्रमण सुरक्षित रहाते,पदांचे तुकडे चघळायला मिळतात.विजय वहाडणे एकटेच पत्रकार परिषद घेतात.त्यांच्याविरुद्ध मात्र जनतेने नाकारलेले-अतिक्रमण करणारे-दोन नंबरकडून वर्षानुवर्षे हप्ते घेणारे-ठेकेदाराला लुटणारे,संस्था खाणारे-ठेकेदाराचे भागीदार एकवटले आहेत.वहाडणे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला हे मान्य आहे.पण मोदी लाट व कोट्यावधी रुपये असूनही तुमच्या नेत्या का पराभूत झाल्या याचे उत्तर द्या ?
वाळूचे ठेके चालविणारे नेते कोण ? याबाबत बोलायची हिंमत दाखवा.वाळूचे लाभार्थीं जमवून राजकारण करणाऱ्या कोल्हे गटाला येणाऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकविणारच यात शंकाच नाही.महत्वाचे रस्ते,खुले नाट्यगृह इ.कामे रोखणाऱ्याना जनता जागा दाखविणार असल्याचा जाधव यांनी दावा केला आहे.व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिल्ली येथे जाऊन ना.नितीन गडकरी यांना सांगून “गायत्री” कंपनीला पाच क्रमांकाच्या साठवण तलावाचे खोदकाम करायला सांगितले,त्याप्रमाणे कामही सुरू झाले.पण तुम्हीच अडथळे आणल्याने काम थांबले.त्यानंतर आ.आशुतोष काळे व आम्ही प्रयत्न केल्याने पुन्हा काम सुरू झाले.ते काम पूर्णत्वास जाईलच फक्त कोल्हे गटाचे मांजर आडवे यायला नको.संजय सातभाईंच्या नजरेत भरेल असा,अनेक वर्षे कोपरगावसाठी उपयुक्त ठरणारा सिमेंट काँक्रीटचा साठवण तलाव होणार आहे,पण चांगल्या कामाला नेहमीप्रमाणे तुम्ही अडथळे आणायला नको.
खरे तर कोल्हे गटाचे “उद्योग” जाहीर करा असे आम्ही याआधीच सांगितले होते.पण नगराध्यक्षाना अपेक्षा होती कि त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होईल,पण केवळ आदेशावर चालणाऱ्या कोल्हे गटाने तसे न केल्याने नगराध्यक्षांनी उशिरा का होईना त्यांना उघडे पाडल्याने ते चवताळून आरोप करत असल्याचा आरोपही जाधव यांनी शेवटी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close