गुन्हे विषयक
रस्त्यात पाण्याची टाकी ठेवल्याने,शिवीगाळ गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील फिर्यादी महिला या आरोपीस रस्त्यात पाण्याची टाकी का ठेवली ? असा जाब विचरल्याचा राग आल्याने आरोपी संजय नाथू कोळपे,व त्याची पत्नी ताई संजय कोळपे यांनी आपल्याला अर्वाच्च शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्या प्रकरणी फिर्यादी शिवबाई बबन कोळपे यांनी आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी दीर संजय कोळपे याने दि.२७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पाण्याची टाकी ठेवल्याचे फिर्यादी महिलेस लक्षात आले.त्यांना त्याचा त्रास हा पाणी आणण्याच्या वेळी झाला याचा जाब फिर्यादी महिला शिवबाईं कोळपे यांनी आरोपी संजय कोळपे यांना विचारला.त्याचा आरोपी संजय कोळपे यांना राग आला त्याने फिर्यादी महिलेस अर्वाच्च शिवीगाळ करून या महिलेला इजा पोहचविण्याची धमकी देऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला व त्यांचा दीर हे कोळपेवाडी येथे शेजारी-शेजारी राहातात.त्यांच्या दोन घरांच्या समोरच एक अरुंद बोळ असून या बोळीचा वापर हे दोन्ही कुटुंब करतात.मात्र या बोळीत आरोपी दीर संजय कोळपे याने दि.२७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पाण्याची टाकी ठेवल्याचे फिर्यादी महिलेस लक्षात आले.त्यांना त्याचा त्रास हा पाणी आणण्याच्या वेळी झाला याचा जाब फिर्यादी महिला शिवबाईं कोळपे यांनी आरोपी संजय कोळपे यांना विचारला.त्याचा आरोपी संजय कोळपे यांना राग आला त्याने फिर्यादी महिलेस अर्वाच्च शिवीगाळ करून या महिलेला इजा पोहचविण्याची धमकी देऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.या प्रकरणी फिर्यादी महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.७३/२०२१ भा.द.वि.कलम ५०९,३४ प्रमाणे आरोपी संजय नाथू कोळपे व त्याची पत्नी ताई संजय कोळपे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.बी.एल.ढाका हे करीत आहेत.