गुन्हे विषयक
कोपरगाव शहरात पोलिसांच्या अवैध व्यावसायिकांवर धाडी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात विविध ठिकाणी अवैध व्यावसायिकांना भलतेच मोकळे रान मिळाल्याने त्यांनी आपला हात उचलून घेतला होता.मात्र नूतन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना मिळालेल्या गुप्त खबरी वरून त्यांनी आपल्या पथकामार्फत टाकलेल्या धाडीत आरोपी एजाज निसार शेख (वय-३०) रा.वैष्णोमंदिर परिसर गांधीनगर,हा रनिंग नावाचा मटका खेळताना तर खुले नाट्यगृहाजवळ आरोपी समीर हारून सय्यद (वय-२८) रा.मक्का मस्जिद जवळ गांधीनगर हा स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदा टेबलवर वरील प्रकारचा मटका खेळताना आढळून आल्याने तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या पश्चिम बाजूस असलेल्या गळ्याच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत आरोपी संतोष सीताराम तांबे (वय-३१) रा.मारुती मंदिराजवळ गांधीनगर आदी आरोपी हे जुगार खेळताना आढळून आल्याने या तिघांवर कोपरगाव शहर पोलिसानी गुन्हा दाखल केल्याने अवैध व्यवसायिकांत खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहरात नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आल्या-आल्या या अवैध व्यवसायिकांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला म्हणून ते कौतुकास पात्र ठरतात मात्र हा उत्साह किती दिवस राहणार हा औत्सुक्याचा विषय राहणार आहे.बऱ्याच वेळा अधिकारी आल्यावर आपला वचक दाखवून आपले हप्ते वाढवून घेण्याच्या घटना बऱ्याच वेळा या पूर्वी घडलेल्या आहेत.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची नियुक्ती होऊन अवघे तीन माहिनेही उलटला नव्हते तरीही त्यांची तातडीने शिर्डी येथे बदली करण्यात आली आहे.त्यांचे कोपरगाव शहरात आल्यापासून काही मन रमले नाही.व त्याचा कामात उत्साह दिसून आला नाही.त्यानी बहुतेक वेळा आपले कार्यालय सोडले नाही.त्यांची हि सोपी पद्धत अवैध व्यावसायिकांत भलतीच लोकप्रिय ठरल्याने अवैध व्यवसायिक भलतेच चेकाळले होते.त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक बनले होते.कोपरगाव शहरात नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आल्या-आल्या या अवैध व्यवसायिकांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला म्हणून ते कौतुकास पात्र ठरतात मात्र हा उत्साह किती दिवस राहणार हा औत्सुक्याचा विषय राहणार आहे.बऱ्याच वेळा अधिकारी आल्यावर आपला वचक दाखवून आपले हप्ते वाढवून घेण्याच्या घटना बऱ्याच वेळा या पूर्वी घडलेल्या आहेत.त्याला अपवाद हे अधिकारी ठरले तर शहरातील नागरिकांना आनंदच वाटेल अन्यथा,”येऱ्या माझ्या मागल्या..” व्हायला नको अशी नागरिकांची इच्छा आहे.त्यांनी आपल्या कामातून आपली लोकप्रियता टिकवली तर लोकांचा विश्वास वाढेल व असामाजिक तत्वांना चाप बसले अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.